Home /News /sport /

Ashes : आधी विराट आता ब्रॉड, दोन दिवसात स्टम्प माईकमुळे दोन वाद, पाहा VIDEO

Ashes : आधी विराट आता ब्रॉड, दोन दिवसात स्टम्प माईकमुळे दोन वाद, पाहा VIDEO

विराट कोहलीचा (Virat Kohli) स्टम्प माईकचा वाद ताजा असतानाच आता ऍशेसमधूनही (Ashes Series) असाच प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या ऍशेस टेस्टच्या दुसऱ्या दिवशी (Australia vs England) स्टुअर्ट ब्रॉड (Sturar Broad) ऑन-फिल्ड कॅमेरामुळे नाराज झाला.

पुढे वाचा ...
    होबार्ट, 15 जानेवारी : विराट कोहलीचा (Virat Kohli) स्टम्प माईकचा वाद ताजा असतानाच आता ऍशेसमधूनही (Ashes Series) असाच प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या ऍशेस टेस्टच्या दुसऱ्या दिवशी (Australia vs England) स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) ऑन-फिल्ड कॅमेरामुळे नाराज झाला. पहिल्या इनिंगच्या 63 व्या ओव्हरवेळी ब्रॉड बॉल टाकण्यासाठी क्रीजपर्यंत पोहोचोला आणि अचानक थांबला. डावखुरा बॅटर मिचेल स्टार्कच्या मागे असलेल्या कॅमेरामुळे ब्रॉडचं लक्ष विचलित होत होतं, ज्यामुळे ब्रॉड संतापला. मैदानातला कॅमेरा बहुतेकवेळा बाऊंड्रीच्या चारही बाजूंनी फिरतो, पण ब्रॉडसाठी हाच कॅमेरा अडचणीचा ठरत होता. कॅमेरामुळे ब्रॉडने त्याचा रनअप अचानक थांबवला. बॅटिंग करत असलेला स्टार्क आणि विकेटकीपर सॅम बिलिंग्स याला काही समजायच्या आतच ब्रॉड स्पायडर कॅम आणि प्रसारण करणाऱ्या चॅनलवर भडकला. रोबोटला हलवणं थांबवा, असं ब्रॉड संतापून म्हणाला. ब्रॉडचा हा अवतार पाहून कॉमेंटेटरनाही हसू आवरलं नाही. सोशल मीडियावर ब्रॉडचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीच्या नियमांमुळे ऍशेसच्या पहिल्या चार पैकी दोन टेस्ट मॅच खेळू शकला नाही. दोन टेस्ट मॅचमध्ये संधी न मिळाल्यामुळे ब्रॉड नाराज झाला होता. ब्रिस्बेन आणि मेलबर्नच्या खेळपट्टीवर बॉलिंगची संधी न मिळाल्यामुळे ब्रॉड निराश झाला. पण होबार्टमधल्या डे-नाईट टेस्टमध्ये ब्रॉडला त्याचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 24.4 ओव्हरमध्ये 59 रन देऊन 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. ब्रॉडने मागच्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शतकं करणाऱ्या उस्मान ख्वाजाला सुरूवातीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, यानंतर त्याने 44 रनवर खेळणाऱ्या धोकादायक मार्नस लाबुशेनचीही विकेट घेतली. इंग्लंडच्या बॉलिंगवर भारी पडणाऱ्या नॅथन लायनला ब्रॉडने आऊट केलं. लायनने 27 बॉलमध्ये 31 रन केले होते. DRS चा वाद, विराटची स्टम्प माईकवर टीका, आता SuperSport ने दिलं प्रत्युत्तर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ashes

    पुढील बातम्या