News18 Lokmat

शूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध

अंजली भागवतनंतर अशी कामगिरी करणारी दुसरी नेमबाज

News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2019 05:24 PM IST

शूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध

दिल्ली, 23 फेब्रुवारी : भारताची नेमबाज अपूर्वी चंदेलाने ऐतिहासिक कामगिरी करत दिल्लीत सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्डकपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. अपूर्वीने अंतिम फेरीत 252.9 अशा विक्रमी गुणांसह सुवर्ण पदकावर नाव कोरले.

पात्रता फेरीत अपूर्वी चौथ्या स्थानावर राहिली होती. तिने 629.3 गुण मिळवले होते. सिंगापूरच्या हो जी यी 629.5 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर तर चीनच्या जाओ रुझूने 634.0 आणि जू यिंगजी ने 630.8 गुणासंह अनुक्रमे पहिले आणि दुसऱे स्थान पटकावले होते. रुझूने पात्रता फेरीतच नवा विश्वविक्रम केला होता. या फेरीतून 8 नेमबाज अंतिम फेरीत पोहचले होते.

अंजली भागवत नंतर महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी अपूर्वी भारताची दुसरी नेमबाज ठरली आहे. या स्पर्धेत भारताचे इतर नेमबाज मोद्गिल आणि एलवेनिल वलारिअन अनुक्रमे 10व्या आणि 30 व्या स्थानावर राहिले.

अपूर्वीने चंदेलाने याआधी 2015 मध्ये चेंगवोनमध्ये आयएसएसएफ वर्ल्डकपमध्ये रौप्य पदक पटकावले होते. त्यापूर्वी 2014 ला ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण आणि 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. गेल्यावर्षी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत तीने 10 मीटर एअर राय़फल प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं.

भारताकडून पुढच्या वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलंम्पिक स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर तिने आणि अंजुम मोद्गिलने नेमबाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...