नवी दिल्ली, 8 जून : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या पैलवानांची भेट घेतल्यानंतर क्रीड मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याची कुस्तीपटूंची मागणी मान्य केली आहे. “सरकार दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करेल”, असं क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पैलवानांनी क्रीडामंत्र्यांसोबत सहा तासांच्या बैठकीत एफआयआरवर आरोपपत्र 15 जूनपर्यंत दाखल करण्याची आणि 30 जूनपर्यंत डब्ल्यूएफआय निवडणुका घेण्याची मागणी केली होती. तोपर्यंत आंदोलन पुढे ढकलण्याचे त्यांनी मान्य केले होते. मिशन ऑलिम्पिक सेलच्या (एमओसी) 100व्या बैठकीनंतर ठाकूर म्हणाले, “आम्ही खेळाडूंना जे काही आश्वासन दिले आहे ते आम्ही पूर्ण करू.” 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल. त्यानंतर जो काही निर्णय घ्यावा लागेल, तो न्यायालय घेईल. ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाईल. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय जो काही निकाल देईल त्यानुसार कारवाई केली जाईल. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्ती निवड चाचणीच्या प्रश्नावर ते म्हणाले, “भारतीय ऑलिम्पिक संघटनेची तदर्थ समिती कुस्तीचे काम पाहत आहे.” 15 जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत संघाचं नाव पाठवायचं आहे. वाचा - खेळ तर एकाच पिचवर खेळवला जातो, मग क्रिकेटच्या मैदानावर अनेक पिच का असतात? ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या अटकेविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन जोपर्यंत WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना तुरुंगात टाकले जात नाही तोपर्यंत ते आंदोलन करत राहतील, असे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. तपासाची गती संथ असल्याचा पैलवानांचा आरोप होता. कुस्तीपटू विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी सातत्याने ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी सरकारने ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले होते- “सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास उत्सुक आहे. मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.