भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या चाहत्यांन गोड बातमी देत लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. आता भारताचा आणखी एक माजी गोलंदाजी बाबा होणार असल्याची चर्चा आहे. (Instagram)
मुंबई इंडियन्सचा कोच आणि भारतीय संघाचा माजी गोलंदाज जहीर खान पत्नी सागरिकासोबत सध्या युएइमध्ये आहे. जहीर खानच्या वाढदिवशी सागरिकानं ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. यात सागरिकाचे बेबी बम्प दिसत होते. (Instagram)
सागरिकाच्या फोटोवरून जहीर खान बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही आहे. (Instagram)
जहीर खानच्या एका जवळच्या मित्रानं याबाबत खुलासा केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जहीर-सागरिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. (Instagram)
जहीर खान आणि सागरिका यांचा विवाह 2017 ला झाला होता. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पद्धतीने हा विवाह पार पडला. (Instagram)
जहीर हा भारताचा यशस्वी माजी गोलंदाजी असून सागरिका अभिनेत्री आहे. सागरिकानं चक दे इंडिया सारख्या ब्लॉकब्लास्टर सिनेमांमध्ये काम केले आहे. सागरिकानं मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. (Instagram)