Home /News /sport /

IND vs ENG : धक्कादायक! रवी शास्त्रींनंतर टीम इंडियातल्या आणखी दोघांना कोरोना

IND vs ENG : धक्कादायक! रवी शास्त्रींनंतर टीम इंडियातल्या आणखी दोघांना कोरोना

टीम इंडियातल्या आणखी दोघांना कोरोना

टीम इंडियातल्या आणखी दोघांना कोरोना

भारतीय टीमला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचदरम्यान (India vs England 4th Test) मोठा धक्का लागला. टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यानंतर आता बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे.

पुढे वाचा ...
    लंडन, 6 सप्टेंबर : भारतीय टीमला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचदरम्यान (India vs England 4th Test) मोठा धक्का लागला. टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यानंतर आता बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. या तिघांच्या आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट सोमवारी मिळाले आहेत. रवी शास्त्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोघांना संपर्कात आल्यामुळे आधीच आयसोलेट करण्यात आलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजची चौथी टेस्ट लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. या मॅचच्या चौथ्या दिवशीच रवी शास्त्रींना कोरोना झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता शास्त्री यांच्यासह भरत अरुण आणि आर.श्रीधर यांनाही 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहावं लागणार आहे. 4 सप्टेंबरला करण्यात आलेल्या लॅटरल फ्लो टेस्टमध्ये रवी शास्त्री पॉझिटिव्ह आले होते. यानंतर त्यांना आयसोलेट करण्यात आलं होतं. रवी शास्त्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचीही टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्यात आली. रवी शास्त्री यांच्या घशाला त्रास होत आहे. 59 वर्षांच्या शास्त्रींनी टीम हॉटेलमध्ये आपल्या पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता, यावेळी ते कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्याचं वृत्त आहे. याशिवाय भरत अरुण, नितीन पटे आणि श्रीधर हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रवी शास्त्री आता टीम इंडियासोबत पाचव्या टेस्टसाठी मॅनचेस्टरलाही जाणार नाहीत. एवढच नाही तर भारतात परतण्याआधी त्यांना आयसोलेशन कालावधी पूर्ण करावा लागेल, तसंच रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते भारतात परतू शकतात. बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधरदेखील पाचव्या टेस्टमध्ये नसतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, India vs england, Ravi shastri

    पुढील बातम्या