30 ऑगस्ट : बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यापुढच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. कोलकात्यात बीसीसीआयच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आलीय.
पण, त्यापूर्वीच एन. श्रीनिवासन आणि बीसीसीआय यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलीय. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती पुन्हा नेमण्यात यावी यासाठी बिहार क्रिकेट संघटना सुप्रीम कोर्टात गेलीय.
कोलकात्याच्या या बैठकीत एन श्रीनिवासन हे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याची सूत्रांची माहिती होती. पण या नोटीशीमुळे पुन्हा ते अडचणीत आले आहे.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.