नारायण राणे कोणत्या मंत्र्यांचा करणार भार हलका ?

नारायण राणे कोणत्या मंत्र्यांचा करणार भार हलका ?

राज्यात काही मंत्र्यांकडे एका पेक्षा अधिक खाती आहेत. त्यांच्यापैकी काही खात्यांचा भार कमी केला जाणार आहे.

  • Share this:

03 सप्टेंबर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 10 ऑक्टोबरला नक्की झालाय. नारायण राणेंचा प्रवेश नक्की मनाला जातोय. अशात राणे कुठल्या मंत्र्यांचा भर हलका करणार याकडे लक्ष लागलंय.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारकडे डोळे लावून बसलेल्याची प्रतीक्षा संपलीय. फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार 10 ऑक्टोबरला निश्चित झालाय. नव्यानं पक्ष स्थापन झाल्यानंतर राणे एनडीएत येऊन मंत्री होणार हे निश्चित मानलं जाताय.

राज्यात काही मंत्र्यांकडे एका पेक्षा अधिक खाती आहेत. त्यांच्यापैकी काही खात्यांचा भार कमी केला जाणार आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल, मदत आणि पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम खातं आहे. विनोद तावडेंकडे शिक्षण, उच्च तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, सांस्कृतिक आणि अल्पसंख्याक, पंकजा मुंडेंकडं ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण खातं आहे. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि राज्य उत्पादन शुल्क अशी खाती आहेत.

काही मंत्र्यांना नारळ देण्याची चर्चाही सुरू झालीये. तर मंत्रिमंडळात काही नवे चेहरेही दिसणार असल्याचं राजकीय अभ्यासक सांगतायेत. राणेंसोबत आणि कोणकोण मंत्रिमंडळात येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 09:56 PM IST

ताज्या बातम्या