नांदा सौख्य भरे, राणे एनडीएत आणि शिवसेनाही !

एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या शिवसेना आणि राणेंना एकाच मांदियाळीत बसावं लागणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2017 08:32 PM IST

नांदा सौख्य भरे, राणे एनडीएत आणि शिवसेनाही !

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

07 आॅक्टोबर : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी एनडीएत जाण्याची घोषणा केलीय. त्यामुळे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या शिवसेना आणि राणेंना एकाच मांदियाळीत बसावं लागणार आहे.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, हे सांगायला काही शिवसेना तयार नाही. आम्ही निर्णयाच्या जवळ नक्कीच आहोत, असं म्हणणारी शिवसेना 5 वर्ष सत्ता टिकावी ही जनतेची इच्छा असल्याचं सांगतेय. तर दुसरीकडे नारायण राणे एनडीएत आल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया वेगळीच होती.

राणेंनी पक्ष स्थापनेची घोषणा करताना पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मंत्री आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत आपल्या पक्षाची आगामी भूमिका काय असणार याचे संकेत दिले होते. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजकीय शत्रू शिवसेना असेल यात काही शंका नाही.

राणे हे आक्रमक नेते आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसविरोधात राणेंचा प्रचार हा भाजपला फायदेशीर ठरू शकतो. तसंच राणेंना एनडीएत राजकीय बळ मिळाल्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना हा सत्तेतला संघर्ष अधिक तीव्र होताना दिसेल. नेमकं भाजपला तेच हवं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...