जाहिरात
मराठी बातम्या / स्पेशल स्टोरी / कैद्यांनी बनवलेल्या चपला चालल्या सातासमुद्रापार!

कैद्यांनी बनवलेल्या चपला चालल्या सातासमुद्रापार!

कैद्यांनी बनवलेल्या चपला चालल्या सातासमुद्रापार!

कधी काळी गुन्ह्यासाठी वापरलेल्या हातांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या चपला आता सातासमुद्रापार जाणारेत. कारागृह प्रशासनानं कैद्यांसाठी राबवलेल्या नवनवीन प्रयोगातून कैद्यांचं हे कसब जगासमोर येतंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    वैभव सोनावणे, पुणे, 29 मे : कधी काळी गुन्ह्यासाठी वापरलेल्या हातांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या चपला आता सातासमुद्रापार जाणारेत. कारागृह प्रशासनानं कैद्यांसाठी राबवलेल्या नवनवीन प्रयोगातून कैद्यांचं हे कसब जगासमोर येतंय. या चकचकीत चपला आणि बूट सध्या जगभरात अनेकांचं लक्ष वेधून घेताहेत. पण बातमी ही आहे की या सुंदर चपला ज्या कारागिरांच्या हातांनी बनवल्यात ते कारागीर आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताहेत. येरवडा कारागृहातील कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईतील तरुण उद्योजक दिवेज मेहता यांनी कारागृहाच्या साथीनं ५५ कैद्यांना चपला बूट बनवण्याचं ट्रेनिंग दिलंय. या ट्रेनिंगमुळे सरकारलाही चांगलाच फायदा होतोय. कैद्यांनी तयार केलेल्या चपला दिवेज मेहतांनी मोठ मोठे मॉल्स आणि शोरूम्समध्ये इनमेंट या ब्रँड खाली विक्रीला ठेवल्यात. त्याला अगदी परदेशातूनही जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या यशस्वी प्रयोगानंतर आता कोल्हापूर कारागृहातील कैद्यांनाही प्रशिक्षण देऊन कोल्हापुरी चप्पल आंतराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा विचार आहे. या उपक्रमामुळे कैद्यांना प्रचंड आत्मविश्वासाबरोबर  कारागृहातून सुटल्यावर सन्मानानं जगण्याचं साधनही मिळणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात