काँग्रेस ते राष्ट्रपती, प्रणव मुखर्जींचा प्रवास

काँग्रेस ते राष्ट्रपती, प्रणव मुखर्जींचा प्रवास

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा आजचा शेवटचा दिवस. त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. पाच दशकं राजकारणात आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या प्रणब दांच्या कारकिर्दीचा हा आलेख...

  • Share this:

अजय कौटिकवार,मुंबई

23 जुलै : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा आजचा शेवटचा दिवस. त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. पाच दशकं राजकारणात आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या प्रणब दांच्या कारकिर्दीचा हा आलेख...

अफाट स्मरणशक्ती, इंग्रजी भाषेवरील उत्तम प्रभुत्व, राजकारणाच्या खाच खळग्यांची उत्तम जाण, काँग्रेस पक्षातील घडामोडींचा गाढा अभ्यास...याच गुणांमुळे प्रणव मुखर्जींचं भारताच्या राजकारणातलं स्थान अढळ राहिलं...पाच वर्षांची राष्ट्रपतीपदाची यशस्वी कारकीर्द पूर्ण करून 'प्रणब'दा आता एका नव्या इनिंगला सुरवात करताहेत.

पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर जिल्ह्यात 1969मध्ये 'प्रणब'दांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ते राज्यसभेचे खासदार झाले. इंदिरा गांधींनी 1973 मध्ये त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं आणि 'प्रणब'दाचा चढता आलेख कायम राहिला तो आजपर्यंत...

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर...मोदी आणि त्यांच्यातले संबंध कसे राहितील याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मात्र राजकीय विचारांचा अडसर राष्ट्रपती मुखर्जींनी आपल्या वागण्यात कधीच येवू दिला नाही. उलट त्यांत उत्तम केमिस्ट्री निर्माण झाली.

अनेक वादग्रस्त मुद्यांवर सरकारला खडेबोल सुनावण्यासही ते कधी कचरले नाहीत. मात्र हे मतभेद बाहेर येवू न देताना त्यांनी  मोदींच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केलं.

'प्रणब'दांच्या राजकीय आयुष्यात अनेकदा चढउतार आलेत. मतभेदांमुळे 1984 मध्ये राजीव गांधींनी त्यांना मंत्री मंडळातून काढून टाकलं. त्यानंतर 1986 मध्ये त्यांनी 'राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस'ची स्थापना केली. दोन वर्षात ते पुन्हा काँग्रेसवासी झाले. तरी गांधी घराण्याला विरोध करण्याचा डाग त्यांना लागला तो कायमचाच...  युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात ते संकटमोचक ठरले. त्यामुळेच 95 पेक्षा जास्त मंत्रिगटाचे ते अध्यक्ष राहिले. यावरून त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांची कल्पना येवू शकते. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये काम करण्याचं 'प्रणव'दांनी जाहीर केलंय. 'प्रणव'दांच्या पुढच्या वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.

First published: July 23, 2017, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading