मेहतांपाठोपाठ सेनेच्या सुभाष देसाईंवर भ्रष्टाचाराचे आरोप

मेहतांपाठोपाठ सेनेच्या सुभाष देसाईंवर भ्रष्टाचाराचे आरोप

इगतपुरीजवळची एमआयडीसीसाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीपैकी चारशे एकर जमीन सुभाष देसाईंनी एका बिल्डरसाठी डिनोटीफाय केल्याचा आरोप झालाय.

  • Share this:

प्राजक्ता पोळ, मुंबई

04 आॅगस्ट : प्रकाश मेहतांवरील भ्रष्टाचाराचा आरोप ताजा असताना आता उद्योगमंत्री सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचा आरोप झालाय. इगतपुरीजवळची एमआयडीसीसाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीपैकी चारशे एकर जमीन सुभाष देसाईंनी एका बिल्डरसाठी डिनोटीफाय केल्याचा आरोप झालाय.

या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या गोंदे दुमालमध्ये ही जमीन आहे. एमआयडीसाठी ही जमीन अधिसूचित करण्यात आली होती. यातली 400 एकर जमीन सुभाष देसाईंनी डीनोटीफाय केली. शिवसेनेजवळच्या एका बिल्डरसाठी जमिनीवरचं नोटीफिकेशन हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणात 3 ते 4 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

प्रकाश मेहतांवरील आरोपांमुळे विधिमंडळात भाजप बॅकफूटवर आहे. भाजप अडचणीत असल्यानं शिवसेनेला गुदगुल्या होत होत्या. पण विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाईंवर आरोपांचा बॉम्ब गोळा टाकलाय. शिवसेना आता या आरोपांना कसं उत्तर देतीये ते पाहावं लागेल.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातल्या गोंदे दुमाल गावाजवळ जमीन

एमआयडीसाठी ही जमीन अधिसूचित झाली होती

400 एकर जमीन सुभाष देसाईंनी डीनोटीफाय केली

शिवसेनेजवळच्या एका बिल्डरसाठी नोटीफिकेशन हटवलं

3 ते 4 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

First published: August 4, 2017, 5:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading