जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / पावसाळ्यात कांदा-लसूण का खाऊ नये? राक्षसाशी काय आहे संबंध?

पावसाळ्यात कांदा-लसूण का खाऊ नये? राक्षसाशी काय आहे संबंध?

पावसाळ्यात कांदा-लसूण का खाऊ नये? राक्षसाशी काय आहे संबंध?

चातुर्मासात कांदा-लसूण न खाण्याचं धार्मिक कारण तुम्हाला माहिती आहे का?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 30 जून : हिंदू धर्मात चातुर्मासाला मोठं महत्त्व आहे. या काळात बरेच उपवास, व्रत आणि पथ्यं पाळली जातात. आषाढी ते कार्तिकी एकादशी या दरम्यानच्या चार महिन्यात चातुर्मास असतो. या कालावधीत कांदा, लसूण, वांगे असे पदार्थ न खाण्याची अनेक घरात पद्धत आहे. या पद्धतीचं कारण काय?  त्याचं पुराणातील कनेक्शन काय आहे? याची सविस्तर माहिती पुण्यातील निनाद कुलकर्णी गुरूजी यांनी सांगितली आहे. वैज्ञानिक कारण? ‘चातुर्मास हा पावसाळ्याचा कालावधी आहे. या काळात आपली पचनशक्ती अत्यंत कमी झालेली असते. कांदा, लसूण यासारखे जड पदार्थ खाल्ले तर त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या चार महिन्यात हे पदार्थ खाणे टाळावे’, असं कुलकर्णी यांनी सांगितलं.

News18लोकमत
News18लोकमत

समुद्रमंथनाशी कनेक्शन चातुर्मासात कांदा-लसूण न खाण्याचं एक कारण पुराणातील गोष्टीमध्येही आहे, अशी माहिती कुलकर्णी गुरूजींनी दिली. ‘समुद्रमंथनानंतर मिळालेलं अमृत प्राशन करण्यासाठी देव आणि दानव यांच्यात स्पर्धा लागली होती. त्यावेळी भगवान विष्णू यांनी मोहिनीरुप धारण केले. त्यांनी अमृताचा कुंभ असुरांकडून आणला. तो देवाला वाटत असताना एक राक्षसही देवाचे रुप धारण करून आला होता. तो राक्षस म्हणजे राहू. राहूने अमृताचा थेंब प्राशन केला आणि त्याला बघताक्षणी भगवान विष्णूंनी आपल्या घडघाने त्याच्या मस्तकाचे दोन तुकडे केले. त्याचे मस्तक उडेपर्यंत याने त्या अमृताचे काही थेंब प्राशन केले. त्यामुळे हा अमर झाला याच्या शरीराचे दोन भाग होताना. सगळ्या गडबडीमध्ये अमृताचे दोन थेंब त्याच्या तोंडातून खाली जमिनीवर पडले. त्या दोन थेंबांपासून कांदा आणि लसूण यांची निर्मिती झाली. असं पुराणांमध्ये उल्लेख आहे. Chaturmas : लग्नाळूंना दूर झाला चातुर्मासाचा अडथळा, गुरूजींनी सांगितलं नेमकं कारण अमृताच्या थेंबातून तयार झालेले कांदा-लसूण हे आरोग्याला चांगले आहेत. पण, ते थेंब राक्षसाच्या मुखातून पडल्यामुळे तामसी वृत्ती वाढवणारे आहेत, असा दावा कुलकर्णी यांनी केला. चातुर्मास हा पवित्र काळ समजला जातो. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त भगवंताची उपासना करावी. सात्विकता वाढेल यावर लक्ष द्यावं. या कालावधीत कांदा-लसूण खाल्ले तर आपली तामसीवृत्ती वाढू लागते. त्यामुळे शास्त्रामध्ये कांदा-लसूण खाणं टाळावं असं कुलकर्णी गुरूजी यांनी स्पष्ट केले.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात