आकाश गौर, प्रतिनिधी मुरैना, 20 जुलै : तुम्हे भगवान शंकराच्या अनेक चमत्कारांबाबत ऐकले असेल. मात्र, मध्यप्रदेश राज्यातील मुरैना जिल्ह्यातील चमत्काराबाबत तुम्हाला माहिती झालं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल. याठिकाणी या मंदिरात पहाटेच्या सुमारास आपोआप तांदूळ आणि बेलपत्र अर्पण केलेले दिसतात आणि आतापर्यंत कुणालाही हे रहस्य कळू शकलेले नाही. या मंदिरात रात्री थांबायला मनाई आहे. मुरैना शहरापासून 70 किमी अंतरावर दूर भीषण जंगलात बनलेल्या या मंदिरात अनेक चमत्कार पाहायला मिळतात. इथे सतत 12 महिने भगवान भोलेनाथच्या मूर्तीवर 24 तास जलअभिषेक सुरू असतो. ही मूर्ती पर्वताच्या खाली आहे. इथे 12 महिने मूर्तीवर पाणी पडत असते. तसेच जंगलात फक्त याठिकाणी पाणी मिळते. बाकी कुठेही नाही.
येथे श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथच्या मूर्तीवर सकाळच्या सुमारास आपोआप बेलपत्र आणि तांदळाने पूजा झालेली दिसते. याचे रहस्य आजपर्यंत कुणालाच कळू शकलेले नाही. अनेक माध्यमांची लोकं याठिकाणी आहे आणि रात्रभर याठिकाणी कॅमेरा लावून बसले. मात्र, त्यांना सकाळच्या पहिल्या प्रहरमध्ये अनेक प्रकारचे आवाज येऊ लागले आणि साप, विंचू निघू लागल्याने ते लोक घाबरले. त्यांनी इथे उपस्थित पुजारी यांच्याशी संवाद साधला तर ते म्हणाले की, तुम्ही वर येऊन जा आणि मग काय, मूर्तीच्या चारही बाजूंना त्यांनी कॅमेरे लावले आणि ते वर आले. मात्र, कॅमेऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची रेकॉर्डिंग होऊ शकली नाही. कॅमेरा आपोआप खाली पडला आणि पूजा कधी आणि कशी झाली, याबाबत कुणालाही कळले नाही. या मंदिरात कसे पोहोचाल - या मंदिरात जाण्यासाठी तुम्ही भाड्याच्या वाहनानेही येऊ शकतात. तसेच मुरैना बस स्टँडपासून आपल्याला पहाडगडसाठी बसने जावे लागेल. यानंतर पहाडगड येथून आपल्याला ई रिक्शा किंवा अन्य वाहन मिळू शकते. तेथून तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. श्रावणात भरते यात्रा - श्रावणात याठिकाणी एका यात्रेचे आयोजन केले जाते. या मेळ्यांमध्ये अनेक जण दूर-दूरवरुन येतात. या व्यतिरिक्त या चमत्कारालाही जाणून घेण्यासाठी अनेक जण देश विदेशातून याठिकाणी येतात.