जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / दारात किंवा घरात अचानक बेडूक दिसण्याचा अर्थ काय? अशा गोष्टींचा तो संकेत मानतात

दारात किंवा घरात अचानक बेडूक दिसण्याचा अर्थ काय? अशा गोष्टींचा तो संकेत मानतात

अचानक बेडूक दिसण्याचा अर्थ

अचानक बेडूक दिसण्याचा अर्थ

ज्योतिषशास्त्रात असंही मानलं जातं की, बेडूक दिसणं जीवनातील काही मोठ्या बदलांचे संकेत असतात. घराच्या बाहेर किंवा आत बेडूक दिसण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 जून : घराच्या आजूबाजूला एखादा विशिष्ट प्राणी पाहणं किंवा अचानक घरात येणं हिंदू धर्मात अनेक प्रकारे शुभ मानले जाते. मेंढक म्हणजे बेडूक हा देखील अशाच प्राण्यांपैकी एक आहे. जो वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्यावर वेगवेगळे अर्थ काढले जातात. ज्योतिषशास्त्रात असंही मानलं जातं की, बेडूक दिसणं जीवनातील काही मोठ्या बदलांचे संकेत असतात. घराच्या बाहेर किंवा आत बेडूक दिसण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. जाणून घेऊया याविषयी कोणता संकेत भाग्यशाली आणि कोणता अशुभ मानला जातो. बेडूक दिसण्याचे संकेत - अचानक बेडूक दिसणे - पावसाळ्यात बेडूक भरपूर दिसतात, त्यावेळी सहज कुठेही बेडूक दिसतात. पण जर पावसाळा नसताना तुम्हाला अचानक बेडूक दिसला तर समजून घ्या की, तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. बेडूक हा सुखी जीवन आणि भाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्यांचे अचानक येणे शुभ मानले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

दारात बेडकाचं दर्शन - जर तुम्हाला तुमच्या घराच्या दारात उंबरठ्याजवळ किंवा तुम्ही कुठेतरी जात असाल आणि बेडूक समोरून उडी मारून रस्ता ओलांडला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे. असे मानले जाते की घराच्या उंबरठ्याजवळ बेडूक दिसणे, हे देखील चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे. घरातील पाण्याची टाकी ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? नाही होणार धनहानी, रोगराई घरात बेडूक येणं - घराबाहेर बेडूक दिसणे हे आरोग्याचे प्रतीक मानले जाते. पावसाळा नसतानाही घरात बेडकाचा प्रवेश सुख-समृद्धीचे लक्षण मानले जाते. घरात बेडूक आला तर समजा तुमच्या घरासाठी धन आणि संपत्तीचे दरवाजे उघडणार आहेत. बेडकाच्याबाबतीत असं घडल्यास तुम्हाला सर्व प्रकारच्या क्षेत्रांतून धन लाभ मिळू शकेल. यांचे मतभेद टोकाला जाऊ शकतात; या राशीचे लोक एकत्र आले तर वाद ठरलेला (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात