मुंबई, 10 मे : कुंडलीत कोणताही ग्रह कमजोर असेल किंवा ग्रहदोष असेल तर कित्येक क्षेत्रात अशुभ परिणाम मिळतात. म्हणूनच ग्रह दोष दूर करण्यासाठी उपाय केले जातात. ज्योतिषशास्त्राची शाखा असलेल्या रत्नशास्त्रामध्ये ग्रहांच्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी रत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने धारण केलेली रत्ने चमत्कारी परिणाम देऊ शकतात. आज आपण चंद्रमणी किंवा मूनस्टोन या शक्तिशाली रत्नाबद्दल जाणून घेऊया, हे रत्न धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. मूनस्टोन धारण करण्याचे फायदे - मूनस्टोनला मराठीत चंद्रमणी रत्न म्हणतात. हे चंद्राचे रत्न मानले जाते. कुंडलीत चंद्र दोष असल्यास किंवा चंद्र कमजोर असल्यास मूनस्टोन घालण्याचा सल्ला दिला जातो. चंद्रदोषामुळे माणूस तणावाखाली राहतो, त्याला नेहमी अस्वस्थता जाणवते, वैवाहिक जीवनात गडबड होते, योग्य निर्णय घेता येत नाहीत. त्याचा प्रत्येक कामात आत्मविश्वास कमी राहतो, असे म्हणता येईल.
मूनस्टोन किंवा चंद्रमणी रत्न धारण केल्याने व्यक्तीचे मानसिक संतुलन चांगले राहते. तो मानसिकदृष्ट्या मजबूत बनतो, त्याची निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहते, आत्मविश्वास वाढतो. चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे आणि या राशीच्या लोकांसाठी मूनस्टोन धारण करणे खूप फायदेशीर आहे. हे रत्न सर्जनशीलता देखील वाढवते. यंदा 8 श्रावण सोमवार! अधिक-निजमास मिळून 59 दिवसांचा असेल श्रावण महिना मूनस्टोन कसे घालायचे - चंद्रमणी हा सकारात्मक रत्न मानला जातो. चंद्रमणी धारण केल्यानं व्यक्तीभोवती नकारात्मक ऊर्जा येत नाही. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील सोमवारची रात्र मूनस्टोन धारण करण्यासाठी शुभ मानली जाते. सोमवारी रात्री गंगाजल आणि गाईच्या दुधाने शुद्ध करून महादेव आणि चंद्रमाला अर्पण करा. नंतर करंगळीवर घाला. पौर्णिमेची रात्र देखील मूनस्टोन घालण्यासाठी खूप शुभ मानली जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







