मराठी बातम्या /बातम्या /religion /

घरामध्ये गंगाजल ठेवायचंय? या नियमांचे करा पालन

घरामध्ये गंगाजल ठेवायचंय? या नियमांचे करा पालन

गंगाजल

गंगाजल

हिंदू धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर जवळपास 1.2 अब्ज लोक हिंदू धर्माचं पालन करतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: हिंदू धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर जवळपास 1.2 अब्ज लोक हिंदू धर्माचं पालन करतात. भारतातून उगम पावलेला हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो. धर्माची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्यात असणाऱ्या देवता, धार्मिक विधी आणि परंपरांची संख्याही मोठी आहे. तुमच्यापैकीही अनेकजण आपापल्या आराध्यदेवतेची पूजा करत असाल. कुठलीही पूजा करताना एक गोष्ट फार गरजेची मानली जाते, ती म्हणजे गंगाजल. हिंदू धर्मात कोणत्याही देवतेची पूजा किंवा धार्मिक-मंगल कार्य गंगाजलाशिवाय अपूर्ण मानलं जातं. असं मानलं जातं की, गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याने माणसाची सर्व पापं दूर होतात आणि मोक्ष मिळतो. यामुळेच सर्व सणांना मोठ्या संख्येने भाविक गंगेच्या तीरावर स्नान करण्यासाठी आणि दान करण्यासाठी पोहोचतात. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गंगेचं दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या घरी एका भांड्यात गंगाजल घेऊन येतात. हे गंगाजल घरामध्ये ठेवणं चांगलं मानलं जातं. पण, हे जल कोणत्या भांड्यात आणावं आणि ते कुठे ठेवावं? याबाबत अनेकांना माहिती नसते. घरामध्ये गंगाजल ठेवण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित काही नियम आणि उपाय जाणून घेतले पाहिजेत. गंगाजलाशी संबंधित काही महत्त्वाची तथ्यं या ठिकाणी देण्यात आली आहेत.

हेही वाचा -  Money Vastu Tips: वास्तुशास्त्राचे हे नियम कायम ध्यानात ठेवा; धनहानी टळेल, नशीब दगा नाही देणार

1) दररोज देवपूजा करण्यापूर्वी देवघरातील देवी-देवतांना आणि स्वतःला गंगेजलाने शुद्ध केलं पाहिजे.

2) शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाला फार महत्त्वाचं मानलं जातं. शंकराच्या जटेतून निघणाऱ्या गंगाजलाला जर एखाद्या व्यक्तीनं दररोज शिवलिंगावर अर्पण केलं तर त्याला लवकरच महादेवाचा आशीर्वाद मिळतो. त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे.

3) तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा शिरली आहे किंवा काही अशुभ घडत आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दररोज तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पवित्र गंगाजल शिंपडावं.

4) असं मानलं जातं की, गंगाजल शिंपडल्याने अचानक लागणारी नजर आणि वाईट स्वप्नांपासून संरक्षण होतं.

गंगाजलाशी संबंधित महत्त्वाचे नियम

1) शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करणारं गंगाजल कधीही अपवित्र ठिकाणी ठेवू नये.

2) पूजेच्या वेळी संकल्पात वापरण्यात येणारं गंगाजल नेहमी पितळ्याच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवावं.

3) गंगाजल कधीही प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवू नये.

4) खराब हातांनी किंवा चप्पल घालून या गंगाजलाला कधीही स्पर्श करू नये.

5) गंगाजल कधीही अंधाऱ्या जागी बंद ठेवू नये.

6) सर्वांत पवित्र आणि वंदनीय मानलं जाणारं गंगाजल नेहमी तुमच्या घराच्या ईशान्य कोपर्‍यात, पूजाघरात किंवा त्याच्याजवळ ठेवावं.

6) तुमच्याकडे गंगाजल कमी असेल तर तुम्ही ते पूजेसाठी किंवा स्नानासाठी साध्या पाण्यात मिसळून वापरू शकता.

7) गंगाजलाला स्पर्श करून कधीही खोटं बोलू नये किंवा वाईट बोलू नये.

First published:

Tags: Ganga river, Religion