मराठी बातम्या /बातम्या /religion /

आर्थिक प्रगतीसाठी घराच्या या दिशेला लावा गोकर्णाचं रोप, देवी लक्ष्मीची होईल कृपा

आर्थिक प्रगतीसाठी घराच्या या दिशेला लावा गोकर्णाचं रोप, देवी लक्ष्मीची होईल कृपा

गोकर्ण आणि वास्तुशास्त्र

गोकर्ण आणि वास्तुशास्त्र

Aparajita Plant Vastu Tips: घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. जाणून घेऊया गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 24 नोव्हेंबर : वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल (अपराजिता) हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. जाणून घेऊया गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील.

गोकर्ण फुलाचे फायदे

धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख-शांतीचे वातावरण राहते.

भगवान विष्णूची कृपा मिळते, माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते, असे मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात.

गोकर्ण कोणत्या दिशेला लावावे -

गोकर्ण फूल घरामध्ये वास्तु नियमानुसार लावावे, तरच त्याचे फायदे मिळतात. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण, उत्तर, ईशान्य दिशेला लावणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता. गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडिया मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Vastu