जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / लाखात एका व्यक्तीच्या तळहातावर असतं हे दुर्मिळ शुभचिन्हं!

लाखात एका व्यक्तीच्या तळहातावर असतं हे दुर्मिळ शुभचिन्हं!

लाखात एका व्यक्तीच्या तळहातावर असतं हे दुर्मिळ शुभचिन्हं!

हातावर मत्स्य, स्वस्तिक, ध्वज, कमळ, मंदिर अशी काही चिन्हं असतील तर ती शुभ मानली जातात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : कठोर परिश्रम करूनही काही जणांना जीवनात सुख-समृद्धी, यश, पैसा अपेक्षित प्रमाणात मिळत नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे काही जणांना कमी श्रमात आणि अल्पावधीत या गोष्टी सहजतेनं मिळतात. हस्तासामुद्रिक शास्त्राच्या अभ्यासकांच्या मते संबंधित व्यक्तीच्या हातावरच्या रेषा आणि विशिष्ट चिन्हांमुळे अशा गोष्टी त्यांच्या जीवनात घडतात. या शास्त्रात हाताची ठेवण, ग्रहांचे उंचवटे, रेषा, चिन्हं, तीळ आदी बाबींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. हातावर मत्स्य, स्वस्तिक, ध्वज, कमळ, मंदिर अशी काही चिन्हं असतील तर ती शुभ मानली जातात. यामुळे संबंधित व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. या चिन्हांचे नेमके अर्थ आणि त्यांचं फलित काय असतं याबाबत जाणून घेऊ या. हस्तसामुद्रिक शास्त्रात माणसाच्या तळहातावरच्या रेषांचा अभ्यास करून त्याच्या जीवनात भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी अंदाज वर्तवला जातो. हस्तसामुद्रिक शास्त्राच्या जाणकारांच्या मते, तळहातावर मत्स्य, ध्वज, स्वस्तिक, कमळ, मंदिर यांसारखी काही चिन्हं असली, तर ती शुभ मानली जातात. यामुळे संबंधित व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक घटना घडतात. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, जर हाताच्या तर्जनीखालच्या गुरू पर्वतावर म्हणजेच चौकोनी उंचवट्यावर त्रिकोणी चिन्ह असेल, तर त्याला मंदिर चिन्ह असं संबोधलं जातं. हे शुभ चिन्ह फार कमी जणांच्या हातावर दिसून येतं. ज्यांच्या हातावर हे चिन्ह असतं अशा व्यक्ती राजेशाही जीवन जगतात. त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. तळहातावर हृदयरेषेच्या दुसऱ्या टोकाला, तर्जनी आणि मधल्या बोटाच्या खाली एक त्रिकोण दिसत असेल तर त्याला कमळाचं चिन्ह म्हणतात. ज्यांच्या तळहातावर हे चिन्ह असतं, त्या व्यक्ती खूप धार्मिक आणि उत्तम शिक्षण घेणाऱ्या असतात. दंडवत प्रणाम करण्यास महिलांना असते मनाई, काय आहे यामागचे कारण? काही जणांच्या तळहातावरच्या केतू किंवा चंद्र पर्वतावर अंडाकृती आकारात मस्त्य चिन्ह तयार झालेलं असतं. हे चिन्ह मनगटावरच्या रेषांच्या अगदी खाली असतं. ज्यांच्या हातावर हे चिन्ह असतं, अशा व्यक्ती संपन्न, धार्मिक वृत्तीच्या, शांत स्वभावाच्या आणि दानधर्माची आवड असणाऱ्या असतात. यांना पाण्याची खूप भीती वाटते. तसंच त्यांना सायनसची समस्यादेखील असते. तळहातावरच्या मस्तक रेषेतून किंवा आयुष्य रेषेतून बाहेर पडणारी एक सरळ रेषा गुरू पर्वताकडे जात असेल आणि तिच्या दुसऱ्या टोकाला चौकोनी खूण असेल तर त्या चिन्हाला ध्वज चिन्ह म्हणतात. हे चिन्ह अंगठ्याजवळ तर्जनीखाली असतं. हस्तसामुद्रिक शास्त्राच्या जाणकारांच्या मते, ज्यांच्या तळहातावर हे चिन्ह असतं, त्यांचा वृद्धापकाळ सुखमय असतो. या व्यक्ती धार्मिक, तसंच उत्तम लेखक असतात. हिंदू धर्मात स्वस्तिक हे चिन्ह शुभ मानलं जातं. तळहातावर हे चिन्ह दोन ठिकाणी दिसून येतं. गुरू पर्वतावर (तर्जनीच्या खाली) आणि बुध पर्वतावर (करंगळीखाली) हे चिन्ह दिसून येतं. तर्जनीखाली गुरू पर्वतावर स्वस्तिक चिन्ह असेल, तर अशा व्यक्तींना धार्मिक कार्याची आवड असते. करंगळीखाली बुध पर्वतावर हे चिन्ह असेल तर संबंधित व्यक्तीला संपत्ती मिळते. या व्यक्ती दानधर्म करण्यात आघाडीवर असतात. (वरील बातमीची News18 लोकमत पुष्टी करीत नाही)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: palm
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात