पुणे, 25 जुलै : संपत्तीची देवी असलेली लक्ष्मी माता हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय आहे. या देवीच्या उपासनेसाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. देवी लक्ष्मीची आठ रूपे आहेत, ज्यामध्ये महालक्ष्मी, तिचे एक रूप, संपत्तीची देवी मानली जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते, त्यांना आयुष्यात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. त्यांचे जीवन आनंदाने जाते, अशी श्रद्धा आहे. घरातील कमावत्या व्यक्तीवर महालक्ष्मीची कृपा असणे अतिशय महत्त्वाचे आहे. लक्ष्मी देवी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक संकेत देते. हे संकेत कोणते ते पाहूया. पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. -अचानक काळ्या मुंग्या आल्या आणि तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काही खाल्ल्या किंवा समूहाने एकत्र जमल्या तर लक्ष्मी देवीची कृपा वाढणार आहे. याचाच अर्थ तुमची थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत, हे स्पष्ट लक्षण आहे.
- तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर तीन सरड्यांचा समूह एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे. यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचेही सूचित होते. - अचानक तुमच्या उजव्या हाताला खाज सुटू लागली तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. - पक्ष्यांचे घरटे बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्ष्याने घरटे बनवले तर ते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे. घरात लावा पोपटाचा फोटो; होतील मोठे लाभ, विद्यार्थ्यांना मिळेल उत्तर - तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजा तुमच्या घरातील संकटे दूर होणार आहेत, तुम्हाला पैसे मिळणार आहेत लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा स्वप्नातूनही मिळतात. तुम्हाला अशी स्वप्ने पडत असतील तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरात विराजमान होणार आहे. तुम्हाला स्वप्नात बिळ असलेला साप दिसला तर तुमच्या घरी धन येणार आहे, असं मानलं जातं. हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते. या पद्धतीची अनेक लक्षणे तुम्हाला धनलाभाचे संकेत देतात, असे जोशी यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)