जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vastu: घरात चप्पल-बूट ठेवण्याची जागा या दिशेला असावी; वाद-भांडणे नाहीत होणार

Vastu: घरात चप्पल-बूट ठेवण्याची जागा या दिशेला असावी; वाद-भांडणे नाहीत होणार

घरात चप्पल-बूट कोणत्या दिशेला काढावेत?

घरात चप्पल-बूट कोणत्या दिशेला काढावेत?

वास्तुशास्त्रात शूज आणि चप्पल घरात ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात बूट आणि चप्पल काढताना आणि ठेवताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, याविषयी जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 जून : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. घराच्या बांधणीपासून ते सजावटीपर्यंत वास्तू नियमांकडे लक्ष दिले जाते. घराची रचना वास्तुशास्त्रानुसार असल्यास अनेक अडचणी निर्माण होत नाहीत, असे मानले जाते. शूज आणि चप्पल उलटे ठेवू नयेत, असे अनेकदा घरांमध्ये ऐकायला मिळते, ते अशुभ मानले जाते. त्यामुळे अनेक प्रकारचे कौटुंबिक वाद उफाळून येऊ शकतात. वास्तुशास्त्रात शूज आणि चप्पल घरात ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात बूट आणि चप्पल काढताना आणि ठेवताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी सांगितलेली माहिती जाणून घेऊ.

News18लोकमत
News18लोकमत

1. शूज आणि चप्पल उत्तर-पूर्व कोनात ठेवू नका: अनेकदा लोक घरात घाई-गडबडीत शूज आणि चप्पल कोठेही काढतात. वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल उत्तर-पूर्व कोनात म्हणजे ईशान्य दिशेला ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. उत्तर किंवा पूर्व दिशेला जोडे-चप्पल काढल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे घराची आर्थिक स्थिती कमकुवत होते. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. कुटुंबातील लोकांचे आरोग्य बिघडू शकते, असे मानले जाते. 2. शूज-चप्पल ठेवण्याची योग्य दिशा : वास्तुशास्त्रानुसार घरात शूज-चप्पलांचे कपाट नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. बाहेरून आल्यानंतर शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढा. घराच्या मुख्य दाराशी शूज आणि चप्पल काढू नयेत हे ध्यानात ठेवावे. झाडुला लक्ष्मी का मानतात? वास्तुनुसार घरातील झाडूविषयी या गोष्टी महत्त्वाच्या 3. नकारात्मक ऊर्जा निवास करते: वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत. असे झाल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते, असे मानले जाते. यामुळे कुटुंबातील सुख-शांती भंग पावते. म्हणूनच शूज-चप्पल कधी उलटे ठेवू नयेत. यामुळे घरात गरिबी येते. जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात