जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / ...म्हणून मंदिराचं नाव आहे करंट बालाजी! देशातलं एकमेव माकडाचं मंदिर

...म्हणून मंदिराचं नाव आहे करंट बालाजी! देशातलं एकमेव माकडाचं मंदिर

प्रतिकात्मक प्रतिमा

प्रतिकात्मक प्रतिमा

या मंदिराचं नाव करंट बालाजी असं आहे. 25 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये इथंल्या वीज केंद्राच्या आवारात नेहमी येणाऱ्या माकडाचा विजेच्या शॉक बसून मृत्यू झाला.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

जोधपूर, 16 मार्च : देवळात देवाची पूजा अर्चा केली जाते, हे तर आपल्या सगळयांनाच माहित आहे; पण आपल्या देशात एक असं देऊळ आहे, जिथं चक्क माकडाची पूजा होते. त्याच्यासाठी पूजापाठ, प्रार्थना केली जाते. आश्चर्य वाटलं नां, पण हे अगदी खरं आहे. हे आगळंवेगळं माकडाचं मंदिर राजस्थानमधील जोधपूर शहरातील भोपाळगड भागात आहे. या मंदिराचं नाव करंट बालाजी (Current Balaji Temple) असं आहे. 23 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये इथंल्या वीज केंद्राच्या आवारात नेहमी येणाऱ्या माकडाचा विजेच्या शॉक बसून मृत्यू झाला. या माकडाच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्युनं इथल्या वीज केंद्रातील कर्मचारी इतके दुःखी झाले की त्यांनी या माकडाची आठवण कायम राहील असं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे मर्कट वंशातील श्री मारुतीरायाची देव म्हणून उपासना केली जाते. त्यामुळं या माकडाच्या स्मरणार्थ या कर्मचाऱ्यांनी त्याचं चक्क मंदिरच बांधण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती एका स्थानिक कर्मचाऱ्यानं दिली. ते म्हणाले, 1998 मध्ये वीज केंद्रातील कर्मचारी 132 जीएसएसवर काम करत असताना त्याचवेळी तिथं नेहमी येणारं हे माकड विजेच्या तारांमध्ये अडकलं आणि विजेच्या धक्क्यानं त्याचा मृत्यू झाला. हे माकड या कर्मचाऱ्यांच्या चांगलं परिचयाचं होतं. ते नेहमी त्या ठिकाणी यायचं, या वीज केंद्राच्या आवाराच्या झाडांवर उड्या मारायचं. कर्मचाऱ्यांनी दिलेला खाऊ खायचं. या सर्व कर्मचाऱ्यांची आणि त्या माकडाची चांगली गट्टी जमली होती. त्यामुळं ते विजेचा धक्का लागून मेल्याचं या कर्मचाऱ्यांना फार वाईट वाटलं. त्याची आठवण जपण्यासाठी त्यांनी हे मंदिर उभारलं. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे जमा केले आणि त्यातून हे मंदिर उभारलं.

News18लोकमत
News18लोकमत

त्या माकडाला वीज केंद्राच्या आवारात मोकळ्या जागेत पुरण्यात आलं; त्याच जागेवर हे मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिरात भगवान बालाजीची मूर्ती स्थापन करण्यात आली असून, त्याचं नाव करंट बालाजी असं ठेवण्यात आलं आहे. हे वाचा -  वाईट असतं झोपेत अशी स्वप्नं पाहणं; भविष्यात खराब दिवस पाहायला लागण्याचे संकेत दर वर्षी मंदिराचा स्थापनादिन साजरा केला जातो. त्यावेळी श्री बालाजीच्या मूर्तीसह माकडाचीही पूजा केली जाते. मृत्युमुखी पडलेल्या माकडाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी इथं दर शनिवारी भजन-कीर्तन आणि रामनामाचा जप करण्यात येतो. अशाप्रकारचं देशातलं हे एकमेव मंदिर असल्याचा दावा केला जातो. वीज केंद्रातील कर्मचाऱ्यांनी एका माकडाप्रती, एका प्राण्याप्रती दाखवलेल्या या जिव्हाळ्याचं, प्रेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात