नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 23 जून : जालना शहराचे आराध्य दैवत तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले आनंदी स्वामी मंदिर प्रसिद्ध आहे. 1700 मध्ये या मंदिराची स्थापना झाल्याचे सांगितलं जातं. 22 जून पासून या मंदिरात सात दिवसांचा उत्सव सुरु झाला आहे. या उत्सवा दरम्यान स्वामींची दररोज वेगवेगळी अशी सात रूपे जालनाकरांना अनुभवयास मिळणार आहेत. जालना शहरात घेतली समाधी आनंदी स्वामी महाराजांनी 1726 मध्ये जालना शहरात समाधी घेतली. तेव्हा पासून महावैद्य अष्टमीला उत्सव होतो. दास नवमीला काला होतो आणि अमावास्या ते पौर्णिमा आषाढ महिन्यात इथे यात्रा भरते. आनंदी स्वामी यांचा प्रकट देऊळगाव राजा इथे बालाजी मंदिरात झाला आहे. समस्थ शिष्य गण यांनी त्यांना आग्रहाने जालन्यात आणले. 1947 पासून जालना शहरात नित्य नेमाने पालखी निघते. निजाम सरकारच्या काळात देखील पालखी निघायची. मागील तीन पिढ्यांपासून आम्ही इथे सेवा देत आहोत यामध्ये कुठलाही खंड पडला नसल्याचे संस्थानचे विश्वस्त रमेश ढोले यांनी सांगितले.
मंदिरात असतात वेगवेगळे कार्यक्रम मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम असतात तसेच नित्य संध्याकाळी सात वाजता आरती होते. आरतीसाठी आम्ही सर्व भक्त येतो. याठिकाणी वातावरण हे सर्व आनंदी आणि प्रसन्न आहे. कधी मंदिरात आले की प्रसन्न असते. कारण की महाराजांचं नावच आनंदी आहे. देऊळगाव राजामध्ये जेव्हा महाराज प्रकट झाले. तेव्हा त्यांना भेटायला आलेल्या लोकांनी विनंती केली की महाराजांचं नाव ठेवायचं. महाराजांचं नाव काय ठेवणार तर महाराजांकडे पाहून सर्वांना आनंद होतो त्यामुळे यांचं नाव आनंदी असं ठेवायचं ठरलं तेव्हापासून महाराजांना आनंदी स्वामी म्हणूनच सगळे ओळखू लागले, असं भाविक समर्थ मयुरे यांनी सांगितले.
Nagpur News : नागपुरात निघाली श्री जगन्नाथ स्वामी रथयात्रा, महाराष्ट्राशी आहे खास नाते Video
महोत्सवात सहभागी होतो आमची पिढ्यान् पिढ्या इथे श्रद्धा आहे. आषाढीचा जो महोत्सव असतो त्यामध्ये आम्ही सहभागी होतो. आमच्या आजोबा वडीलांपासून आम्ही श्रद्धेने इथे येत असतो, असं भाविक तुषार देठे यांनी सांगितले.