विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक, 27 मार्च : पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून नाशिक ओळखल जातं. गोदावरी तीरावर वसलेले नाशिक जगभरात प्रसिद्ध आहे. नाशिक शहरात दररोज हजारो भाविक आणि पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. या ठिकाणी धार्मिक स्थळतर आहेतच मात्र निसर्गाच देखील वरदान नाशिक शहराला लाभलेले आहे. प्रभू श्री राम चंद्राच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकला ओळखलं जातं. नाशिकच्या तपोवनात लक्ष्मणानं रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक कापले असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
काय आहे आख्यायिका?
वनवास काळात प्रभू श्री रामचंद्रांनी नाशिकमध्ये गोदावरी किनारी तपोवनात वनवास केल्याचा रामायणात उल्लेख आहे. शूर्पणखा लक्ष्मणाला पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती. तिची इच्छा होती की आपण लक्ष्मणासोबत लग्न करावं ती इच्छा तिने बोलवून दाखवली. मात्र, हे लक्ष्मणाला कदापि मान्य नव्हत आणि तिला शिक्षा म्हणून लक्ष्मणानं तीच नाक याच तपोवनात कापल होते अशी माहिती धर्मशास्त्र अभ्यासक डॉ.नरेंद्र धारणे यांनी दिली आहे.
इथेच आहे लक्ष्मण रेखा
सीतेला पळवन्यासाठी रावण याच तपोवनात साधूचा वेश घेऊन आला होता. तेव्हा मात्र लक्ष्मणानं सीतेला तिच्या आश्रमात एक रेखा मारून दिली होती आणि सांगितल होत की या रेखाचे बाहेर जाऊ नका म्हणजे तुम्हाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. ती लक्ष्मण रेखा आज ही या ठिकाणी प्रतीकात्मक स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे या तपोवणाचं ऐतिहासिक महत्व आहे, असंही डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितले.
कुठे आहे तपोवन?
नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकापासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावर तपोवन आहे. पंचवटीमध्येच हे ऐतिहासिक ठिकाण आहे. खाजगी बस किंवा इतर वाहनाने तुम्ही तिथपर्यंत पोहचू शकता. सकाळी 8 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत हा परिसर नागरिकांना बघण्यासाठी खुला असतो.
गूगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Nashik, Ram Navami 2023