जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / घरात पितृदोषाची अशी लक्षणं जाणवतात का? येत्या भौमवती अमावस्येला करा हे सोपे उपाय

घरात पितृदोषाची अशी लक्षणं जाणवतात का? येत्या भौमवती अमावस्येला करा हे सोपे उपाय

पितृदोष दूर करण्याचे उपाय

पितृदोष दूर करण्याचे उपाय

पूर्वज शांत-समाधानी असतील तर कुटुंबात सुख-शांती नांदते. घरातील लोकांची प्रगती होत राहते. जेव्हा पूर्वजांचा आपल्याकडून अनादर होतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, तेव्हा ते नाराज होऊ शकतात. त्यामुळे…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च : या वर्षातील पहिली भौमवती अमावस्या 21 मार्च मंगळवारी आहे. भौमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा व दान करावे. यामुळे पाप नाहीसे होऊन पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. भौमवती अमावस्या हा देखील पूर्वजांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. पूर्वज शांत-समाधानी असतील तर कुटुंबात सुख-शांती नांदते. घरातील लोकांची प्रगती होत राहते. जेव्हा तुम्ही पूर्वजांचा अनादर करता, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा ते नाराज होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं. घरात पितृदोषाचीही काही लक्षण आहेत, ज्यावरून तुम्ही जाणू शकता की तुमचे पूर्वज नाराज आहेत. भौमवती अमावस्येला सहज उपाय करून पितरांना प्रसन्न करता येते. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भौमवती अमावस्येला सकाळी 12.42 वाजेपर्यंत शुभ योग तयार होत आहे आणि त्यानंतर शुक्ल योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग संध्याकाळी 05:25 पासून सुरू होत आहे, जो दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालू राहील. या दिवशी सकाळी स्नान करून पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करावे, यामुळे पितृदोष दूर होईल. पूर्वज नाराज असल्याचे संकेत - 1. पितृदोष असेल पूर्वज नाराज असतील तर कुटुंब वाढीचे किंवा संततीप्राप्तीचे सुख मिळू शकत नाही. 2. कुटुंबातील लोकांच्या प्रत्येक कामात अडचणी येऊ लागल्या तर त्याचे कारण पितृदोष असण्याची शक्यता असते. 3. कुटुंबातील एकामागून एक सदस्य आजारी पडत असतील. एक बरा होतो तोवर दुसरा आजारी पडत असेल, तर ते पितृ दोषामुळे किंवा पूर्वजांच्या नाराजीमुळे असू शकते. पूर्वजांची शांती केल्यानं त्यापासून मुक्ती मिळू शकते. 4. पितृदोष असेल तर कुटुंबात कधीही सुख-शांती येत नाही. घरातील सदस्यांमध्ये नेहमी वादविवाद होत राहतील. मतभेदामुळे जीवन त्रस्त होईल. 5. पितृदोषमुळे नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नाही. आर्थिकदृष्ट्या व्यक्ती अडचणीत सापडू शकते. 6. पितृदोषामुळे काही वेळा विवाह किंवा इतर शुभ कार्यात अडचणी येतात. जोपर्यंत पूर्वज संतुष्ट होत नाहीत तोपर्यंत ते अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करतात, असे मानले जाते. त्यामुळे पूर्वजांची शांती करणे आवश्यक असते. अमावस्येला करण्याचे पितृदोष उपाय - 1. भौमवती अमावस्येला सकाळी लवकर गंगा नदीत स्नान करा किंवा घरातील अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा. त्यानंतर पूर्वजांना जल अर्पण करावे. असे केल्याने पूर्वज तृप्त होतात. पितरलोकामध्ये पाण्याची कमतरता असल्याने पूर्वजांना जल अर्पण करून प्रसन्न केले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

2. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भौमवती अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी पिंड दान करू शकता. त्यांचे श्राद्ध कर्म करावे. ब्राह्मणांना-गरीबांना दान द्या, त्यांना खाऊ घाला. कावळे, गाय, पक्षी यांना अन्न द्या. 3. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठीही गाईचे दान केले जाते. हे वाचा -  लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात