मुंबई, 07 जून : संपूर्ण 2023 वर्षामध्ये एकच शनि प्रदोष व्रत आहे. हा उपवास इतका महत्त्वाचा आहे की, लोक त्याची बराच काळ प्रतिक्षा करतात. कारण शनि प्रदोष व्रताचा योग जुळून येणे दुर्मिळ बाब असते. धार्मिक मान्यतेनुसार संतान नसलेल्या जोडप्यांनी शनि प्रदोष व्रत करून भगवान शिवाची विधिवत पूजा करावी, यामुळे पुत्रप्राप्ती होण्याची शक्यता निर्माण होते. शंभू-महादेवाच्या कृपेने माणसाला संततीचे सुख प्राप्त होते. ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊ, शनि प्रदोष व्रत कधी आहे आणि शिवपूजेचा शुभ काळ, मुहूर्त कधी आहे? शनि प्रदोष व्रत 2023 - प्रदोष व्रत नेहमी त्रयोदशी तिथीला केले जाते. पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 1 जुलै शनिवारी सकाळी 01:16 पासून सुरू होईल आणि ही तिथी 1 जुलै रोजी रात्री 11:07 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 1 जुलै रोजी शनि प्रदोष व्रत असेल. शनि प्रदोष व्रत 2023 पूजा मुहूर्त - वर्षातील एकमेव शनि प्रदोष व्रताची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 1 जुलै रोजी संध्याकाळी 07:23 ते 09:24 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा करावी. यामध्ये देखील संध्याकाळी 07:23 ते रात्री 08:39 पर्यंत लाभ आणि प्रगतीचा मुहूर्त आहे.
शनि प्रदोष व्रत 2023 3 शुभ योगात - शनि प्रदोष व्रताच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळपासून रात्री 10.44 पर्यंत शुभ योग आहे. त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल, जो दुसऱ्या दिवशीपर्यंत आहे. याशिवाय त्या दिवशी रवि योग तयार होत आहे. हा योग दुपारी 03.04 ते दुसऱ्या दिवशी 2 जुलै रोजी सकाळी 05.27 पर्यंत आहे. झाडुला लक्ष्मी का मानतात? वास्तुनुसार घरातील झाडूविषयी या गोष्टी महत्त्वाच्या शिववासदेखील शनि प्रदोष व्रताच्या दिवशी - शिववासदेखील 1 जुलै रोजी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी आहे. ज्यांना शंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून रुद्राभिषेक करायचा आहे, त्यांच्यासाठी हा शुभ संयोग घडला आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी शिववास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. त्या दिवशी सकाळपासून रात्री 11.07 पर्यंत शिववास आहे. शनि प्रदोष व्रताचे महत्त्व - वरती सांगितल्याप्रमाणे शनि प्रदोष व्रत आणि शंकराची पूजा केल्यानं पुत्रप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. निपुत्रिक जोडप्यांसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे व्रत केल्याने रोग, दुःख, दोषही दूर होतात, असे मानले जाते. जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)