जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शनिदेवाची पूजा करताना `या` नियमांचं करा पालन

शनिदेवाची पूजा करताना `या` नियमांचं करा पालन

शनीदेव पूजा

शनीदेव पूजा

शनीच्या पूजेसंदर्भातही काही नियम शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन केलं, तर शनिदेवाची कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते, असं जाणकार सांगतात. हे नियम कोणते आहेत, ते जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 डिसेंबर :  ज्योतिषशास्त्रात नवग्रहांमध्ये शनी या ग्रहाला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. शनी हा मंदगती ग्रह मानला जातो. शनीची साडेसाती आणि अडीचकी म्हटलं, की अनेक जण भयभीत होतात. शनिदेव हे कर्म आणि न्यायाचे कारक मानले जातात. याचा अर्थ ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात. हिंदू धर्म आणि शास्त्रात देवदेवतांच्या पूजेसंदर्भात काही विशिष्ट नियम सांगितले गेले आहेत. पूजा करताना या नियमांचं पालन प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने नियमांचं पालन केलं नाही, तर संबंधित देवतेची कृपादृष्टी प्राप्त होत नाही, असं मानलं जातं. शनीच्या पूजेसंदर्भातही काही नियम शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन केलं, तर शनिदेवाची कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते, असं जाणकार सांगतात. हे नियम कोणते आहेत, ते जाणून घेऊ या. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. शनीची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, असं प्रत्येकाला वाटतं. कारण शनीची वक्रदृष्टी पडली तर जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेक जण शनीची नियमित विधिवत पूजा करतात. महिलांनी शनीला स्पर्श करू नये आणि तेल वाहू नये असं मानलं जातं. याशिवाय शनीच्या पूजा-विधीचे आणखी काही नियम आहेत. या नियमांचं काटेकोर पालन केलं, तर शनीची कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते. हेही वाचा - Sankashti Chaturthi : एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ शनी हा पश्चिम दिशेचा स्वामी मानला जातो. त्यामुळे पश्चिम दिशेला तोंड करून शनीची पूजा करावी. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला तोंड करूनही शनीची पूजा करणं योग्य मानलं जातं. योग्य दिशेला तोंड करून शनीची विधिवत पूजा केली तर शुभ फळं मिळू शकतात. शनिदेवाची पूजा करताना काळ्या किंवा निळ्या रंगाची वस्त्रं परिधान करणं शुभ असतं. शनिवारी शनिदेवाच्या चरणाजवळ दिवा लावावा. तसंच निळी फुलं अर्पण करावीत. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला काळ्या तिळाचे लाडू विशेष प्रिय आहेत. तसंच तुम्ही शनिदेवाला काळे तीळ अर्पण करू शकता. याशिवाय त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवू शकता. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात, असं जाणकार सांगतात. ज्योतिषशास्त्रानुसार, देवतांच्या पूजेवेळी तांब्याच्या भांड्यांचा वापर प्राधान्याने केला जातो; पण शनिदेवाची पूजा करताना तांब्याच्या भांड्यांचा वापर कदापि करू नये. सूर्याला तांबं विशेष प्रिय आहे. शनीची पूजा करताना लोखंडाच्या भांड्याचा वापर करावा. कारण शनीला लोखंड विशेष प्रिय आहे. या नियमांचं पालन करून शनीची यथासांग पूजा केल्यास त्यांची कृपादृष्टी नक्कीच प्राप्त होऊ शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात