मराठी बातम्या /बातम्या /religion /

पाल अंगावर पडण्याचे असतात वेगवेगळे संकेत; या भागांवर पडणे असते शुभ

पाल अंगावर पडण्याचे असतात वेगवेगळे संकेत; या भागांवर पडणे असते शुभ

पाल अंगावर पडणे शुभ अशुभ

पाल अंगावर पडणे शुभ अशुभ

घरात पाल दिसणं किंवा पाल अंगावर पडण्याच्या घटना अनेकांच्या सोबत घडतात. पाल दिसण्याचे आणि पाल अंगावर पडण्याचे काही संकेत असतात. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 09 डिसेंबर : ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक रहस्यांची माहिती मिळते. व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांचाही ज्योतिषशास्त्रात तपशीलवार उल्लेख आहे. येथे आपण घरामध्ये दिसणार्‍या प्राण्यांशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल बोलत आहोत. घरात पाल दिसणं किंवा पाल अंगावर पडण्याच्या घटना अनेकांच्या सोबत घडतात. पाल दिसण्याचे आणि पाल अंगावर पडण्याचे काही संकेत असतात. याविषयी भोपाळचे ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

अंगाच्या कोणत्या भागावर पाल पडणे शुभ-अशुभ?

जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं.

ज्योतिष शास्त्रानुसार छातीवर पाल पडली तर तुम्हाला आवडतं अन्न मिळतं.

जर पाल गुडघ्यावर पडली तर सध्या काही चांगली बातमी मिळणार असल्याचा संकेत समजावा.

स्त्रीच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढते आणि उजव्या हातावर पडल्यास सौभाग्य हानी होऊ शकते.

स्त्रीच्या उजव्या गालावर पाल पडली तर तिला सुख मिळू शकते. डाव्या गालावर पडल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

जर एखाद्या महिलेच्या केसांवर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते.

नाकावर पाल पडली तर नशीब चमकते.

मानेवर पाव पडली तर प्रसिद्धी आणि धन प्राप्त होते.

पाठीच्या उजव्या बाजूला पाल पडल्याने आनंद आणि संसाधने वाढतात आणि पाठीच्या डाव्या बाजूला पाल पडल्याने अडचणी वाढतात.

उजव्या हातावर पाल पडली तर धनलाभ होतो. डाव्या तळहातावर पडल्याने धनाची हानी होते आणि प्रियकराची भेट होण्याची शक्यता असते.

डाव्या पायावर पाल पडली तर काही दुःखद घटनेची माहिती मिळते.

जर एखाद्या स्त्रीच्या उजव्या गुडघ्यावर पाल पडली तर ती तिच्या प्रियकराला भेटू शकते.

उजव्या पायाच्या टाचेवर पाल पडल्यास दुःखद घटना किंवा शोक वार्ता प्राप्त होते.

उजव्या कानावर पाल पडल्याने दागिने लाभतात, वय वाढते आणि डाव्या कानावर पडल्याने दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते, कोणताही आजार होऊ शकतो.

अचानक एखादी पाल चेहऱ्यावर पडली तर त्या दिवशी स्वादिष्ट भोजन मिळते, असे मानले जाते.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion