मुंबई, 20 नोव्हेंबर : हिंदू धर्मात पूजा-विधींना विशेष महत्त्व आहे, परंतु पूजा करताना त्याचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत. तरच पूजा पूर्ण मानली जाते. जाणूनबुजून किंवा नकळत लोक पूजेदरम्यान अनेक चुका करतात, त्यामुळे पूजेचे योग्य फळ मिळत नाही आणि पूजा अपूर्ण राहते. चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्याने अशुभ घटनाही घडू शकतात, त्यामुळे पूजेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून पूजा करण्याच्या संपूर्ण पद्धतीबद्दल जाणून घेऊया. यासोबतच आचार्यजींकडून पूजा उभे राहुन करावी की बसून करावी याची माहिती समजून घेऊ. पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा - पौराणिक शास्त्रानुसार उभे राहून पूजा करणे योग्य मानले जात नाही. अशाप्रकारे पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही. घरात पूजा करताना उभे राहून पूजा करू नये आणि थेट जमिनीवरही बसून पूजा करू नये. पूजा करण्यापूर्वी नेहमी आसन घ्यावं आणि आसनावर बसूनच पूजा करावी. यासोबतच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये. स्त्री असो वा पुरुष, पूजा करताना डोके नेहमी टोपी किंवा रुमालाने झाकले पाहिजे. असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने सर्व लाभ आणि पुण्य आकाशात निघून जातात. आसन जमिनीपासून उंच हवं - धार्मिक मान्यतेनुसार आपण ज्या ठिकाणी पूजा करायला बसणार आहोत तिथला पृष्ठभाग पूजास्थानापेक्षा किंवा देव्हाऱ्यापेक्षा उंच नसावा. म्हणजे पूजास्थान खाली आणि आपण बसत असलेला भाग वर असं चुकूनही असू नये. उपासना ही अशी व्यवस्था आहे, जी आपल्याला काही काळासाठी या सांसारिक भ्रमातून काढून टाकते आणि आपल्याला अशा आध्यात्मिक जगात आणते, जिथे आपल्याला शांती, सौहार्द आणि पवित्रता वाटते. त्यामुळे पूजा करताना नियम आणि शुद्धता लक्षात ठेवणे गरजेचे आहे..
पूजा करण्याचा योग्य मार्ग - पूजा करताना नेहमी पूर्व दिशेला तोंड करून बसावे आणि उजव्या बाजूला धूप, अगरबत्ती, दिवा इत्यादी ठेवाव्यात. पूजा करताना फळ, फुले, पाण्याचे पात्र, शंख यांसारखी पूजा सामग्री डाव्या बाजूला ठेवावी. अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ मिळते. तसेच पूजेला बसलेल्या व्यक्तीने कपाळावर टिळा लावलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)