मुंबई, 22 डिसेंबर : आपलं होणारं मूल सुंदर, सुसंस्कृत, निरोगी आणि भाग्यवान असावं, अशी सर्वच गर्भवती महिलांची इच्छा असते. त्याची आयुष्यात खूप प्रगती होवो, त्याच्या आयुष्यात त्रास कमी आणि आनंद जास्त असावा. बाळाच्या जन्मापूर्वी प्रत्येक पालकाच्या मनात अशा अनेक इच्छा असतात. धार्मिक शास्त्रात सद्गुणी आणि चांगले संतान मिळण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, धार्मिक शास्त्रांमध्ये अशा विशेष मंत्रांचा उल्लेख आहे, जे मुलाला भाग्यवान बनविण्यास मदत करतात. जाणून घ्या या मंत्रांचा जप केव्हा आणि कसा करावा. मंत्र जपण्याचे फायदे - ज्योतिषाचार्य यांच्या मते, जरी मुलाचे हुशार आणि सुसंस्कारित असणे त्याच्या संगोपनावर अवलंबून असते. परंतु, गर्भात मूल असताना आई जे काही करते त्याचा थेट परिणाम मुलावर देखील होतो. गर्भवती काळात महिलेने काही मंत्रांचा रोज जप केला तर तिच्या होणाऱ्या मुलावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. शिवाय गर्भवती महिलेचे आरोग्यही चांगले राहते. काही मंत्रांचा जप केल्याने मूल पुण्यवान, धनवान आणि भाग्यवान बनते, असे मानले जाते. मंत्रांचे जप करण्याचे नियम - पहिला मंत्र - रक्ष रक्ष गणाध्यक्षः रक्ष त्रैलोक्य नायकः. भक्त नाभयं कर्ता त्राताभव भवार्णवात्. या मंत्राचा जप करताना श्री गणेशाची मूर्ती समोर असावी. या मंत्राचा जप दररोज 108 वेळा करावा. गर्भवती महिलेच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर त्याची संख्या वाढवणे उत्तम ठरेल. मंत्र जपताना मन शांत ठेवा आणि एकांतात बसा. दुसरा मंत्र संपूर्ण मंत्र विनियोग: अस्य गोपाल मंत्रस्य, नारद ऋषि:, अनुष्टुप छंद:, कृष्णो देवता, मम पुत्र कामनार्थ जपे विनियोग: ध्यान: विजयेन युतो रथस्थित: प्रसभानीय समुद्र मध्यत: . प्रददत्त नयान् द्विजन्मने स्मरणीयो वसुदेव नंदन: . संतान गोपाल मंत्र: ऊं देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते. देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गत: .
मंत्र जपाचे नियम या मंत्राचा जप शक्यतो रुद्राक्षाच्या जपमाळेने करावा. या मंत्राचा एक लाख वेळा जप करावा, असे सांगितले जाते. मात्र, आपल्याला शक्य आहे तितक्या जास्त वेळा हा मंत्र म्हणावा. यानंतर घरी 10 हजार मंत्रांचे हवन करून ब्राह्मणांना किंवा गोर-गरीबांना भोजन करा. मंत्राचा उच्चार करताना मन शांत ठेवा आणि सद्गुणी, निरोगी मुलासाठी देवाला प्रार्थना करा. हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)