मुंबई, 04 जानेवारी : कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि भविष्याचे आकलन त्याच्या चेहऱ्याच्या आकारावरून करता येते, असे सामुद्रिक शास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांपासून ते शरीराच्या डीलडॉलपर्यंत व्यक्तीचे भविष्य सांगता येते. समुद्रशास्त्रात चेहऱ्याचा आकार दोन प्रकारचा मानला जातो. पहिला कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्यासारखा आणि दुसरा आयताकृती किंवा वर्तुळासारखा आकार. चेहऱ्याचा आकार पाहून व्यक्तिमत्त्व आणि भविष्याबद्दल समुद्रशास्त्राचे तज्ज्ञ बरेच काही सांगू शकतात. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत. जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून त्याचे व्यक्तिमत्व आणि भविष्य कसे कळू शकते.
अंडाकृती -
अंडाकृती फेस शेपला इंग्रजी भाषेत ओव्हल शेप फेस म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा अंडाकृती असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि संतुलित स्वभावाचे असेल, परंतु ती व्यक्ती बहुमुखी असते. असे लोक अनेक गोष्टी मिळवतात. या लोकांना त्यांच्या मनावर नियंत्रण कसे ठेवावे हे माहीत असते. अशा महिलांना विशेषत: कलेत रुची असते. अंडाकृती चेहरा असलेले लोक चित्रपट किंवा मीडिया इंडस्ट्रीत खूप नाव कमावतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात. या लोकांना सहज राग येतो आणि त्यांचा स्वभाव थोडा हट्टी असतो.
लांब चेहरा -
लांब चेहऱ्याला इंग्रजी भाषेत लाँग शेप फेस म्हणतात. जर तुमचा चेहरा देखील लांब आणि पातळ असेल तर तुम्ही बलवान लोकांच्या यादीत येता. अशा लोकांना पद्धतशीरपणे जगणे आवडते. अशा लोकांमध्ये अहंकार असेल तर त्यांच्या नात्यात तणाव वाढतो. त्यांच्या स्वभावामुळे अनेक वेळा हे लोक त्यांच्याच लोकांच्या टीकेला बळी पडतात. तरीही, परिस्थितीपुढे हार न मानता स्वतःला चांगले सिद्ध करण्याची क्षमता या लोकांमध्ये आहे.
त्रिकोणी चेहरा -
त्रिकोणी आकाराच्या चेहऱ्याला इंग्रजी भाषेत ट्रायंगल आकाराचा चेहरा म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा त्रिकोणी आकाराचा असेल तर अशी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या थोडी दुबळी असते. हे लोक जन्मापासून प्रतिभावान असतात. त्यांना सर्जनशील आणि कलात्मक काम करायला आवडते. अशा लोकांना छोट्या छोट्या चुकांवर चटकन राग येतो. ते खूप संवेदनशील असतात, त्यांना त्यांच्या कामात ढवळाढवळ करणारे लोक आवडत नाहीत.
हे वाचा - कधीही आरती करताना असं ओवाळावं ताट; पूजा-विधीचे मिळेल इच्छित फळ
चौकोनी चेहरा -
चौकोनी फेसला इंग्रजी भाषेत स्क्वेअर शेप असे म्हणतात. चौकोनी चेहरा असलेले लोक खूप बुद्धिमान मानले जातात. आपल्या बौद्धिक क्षमतेने तुम्ही मोठ्या अडचणींवर मात करू शकता. इतरांसमोर व्यक्त होण्याची कला या लोकांना चांगलीच अवगत असते. चौरस चेहरा असलेले लोक स्वभावाने चटकदार आणि उग्र असतात. या कारणामुळे कधी-कधी त्यांना नुकसानीलाही सामोरे जावे लागते. या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार इतरांकडून काम करून घ्यायचे असते. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Face, Human face, Religion