मुंबई, 27 मे : आपण चांगलं, सुख-सोयींनी संपन्न आयुष्य जगावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी पैशांची गरज असते; पण प्रत्येकाजवळ आपल्या सर्व गरजा पूर्ण करता येतील इतका पैसा किंवा संपत्ती असतेच असं नाही. कौटिल्य अर्थात आर्य चाणक्याने अर्थशास्त्र हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. त्यात जगण्याच्या सर्व पैलूंचा बारकाईने विचार केलेला आहे. चाणक्याने त्यात सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यास धनवान होणं अवघड नाही. चाणक्यनीतीतल्या अशा काही गोष्टींबद्दल आज जाणून घेऊ या. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने दिलं आहे.
1. चाणक्यनीती असं सांगते, की कोणीही व्यक्ती घरबसल्या श्रीमंत होऊ शकत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
2. धन मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला शिस्तप्रिय जीवन जगावं लागेल, असंही आर्य चाणक्य सांगतात.
3. शिस्त बाळगल्याशिवाय व्यक्तीला आयुष्यात कधीच यश मिळू शकत नाही.
4. चाणक्यनीती सांगते, की पैशांची बचत करणं व योग्य वापर करणं खूप आवश्यक आहे.
5. जो माणूस व्यवस्थित विचार करून पैसा खर्च करत नाही, त्याला बुद्धिहीन अर्थात मूर्ख असं म्हटलं जातं.
6. पैशांची बचत केल्याने कोणीही श्रीमंत होऊ शकतं. तसंच अशा व्यक्तींबद्दलचा समाजातला आदर-सन्मानही कायम राहतो.
7. चाणक्यनीती सांगते, की व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना घाबरू नये.
8. आर्य चाणक्यांच्या मते, पैसा योग्य मार्गाने कमवायला हवा. चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा हळूहळू संपू लागतो.
9. आयुष्यात प्रत्येकालाच पुढे जायचंय आणि यशस्वी व्हायचं आहे. काहींना लवकर यश मिळतं, तर काहींना वेळ लागतो. मेहनत आणि चिकाटीने सगळ्या गोष्टी केल्या की त्याचं फळ माणसाला नक्की मिळतं.
घरातील दागिने, पैसा या दिशेला ठेवणं उत्तम; वास्तुशास्त्रानुसार काय कुठं ठेवावं
10. आचार्य चाणक्यांच्या मते, हुशार व्यक्ती नेहमी भविष्यासाठी नियोजन करतात. तुमच्या भविष्यातल्या नियोजनाची माहिती कोणाशीही शेअर करू नये.
11. नियोजन गुप्त राखलं, तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. नियोजन उघड केल्याने कामात यश मिळत नाही. ज्या व्यक्ती आपलं नियोजन गुप्त ठेवतात ते नक्कीच श्रीमंत होतात.
Numerology: विश्वास पात्र असतात अशा व्यक्ती; निष्ठावान जोडीदारही बनू शकतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Religion, Religion18