मुंबई, 02 एप्रिल : ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्र आहेत. ज्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनावर राशी आणि एखाद्या दिवसाचा प्रभाव दिसून येतो, त्याचप्रमाणे आपण ज्या नक्षत्रात जन्म घेतो, त्याचाही आपल्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. पौराणिक कथेनुसार, नक्षत्रांना राजा दक्षाच्या मुलींची संज्ञा दिली गेली आहे. ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म होतो त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात नक्षत्राला (Nakshatra) एक तारा मानले जाते. 9 ग्रह आहेत, म्हणून 27 पैकी प्रत्येक 3 नक्षत्रांचा एक स्वामी ग्रह असतो. येथे आपण आज अश्विनी नक्षत्राबद्दल बोलू. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ.
स्वतंत्र आणि आधुनिक विचाराचे -
अश्विनी नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र आहे. हे सर्वात महत्त्वाचे नक्षत्र मानले जाते. अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक सामान्यतः खूप सुंदर आणि भाग्यवान असतात. एवढेच नाही तर ते मुक्त विचार करणारे मानले जातात. त्यांची विचारसरणीही अतिशय आधुनिक असते.
केतू ग्रहाचा जीवनावर प्रभाव -
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्यांवर केतू ग्रहाचे राज्य असते. अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक शक्यतो मेष राशीचे असतात आणि या राशीचा स्वामी मंगळ आणि केतू यांचा प्रभाव या लोकांवर दिसून येतो. जरी ते सुंदर आणि मजबूत शरीराचे असले तरी कधीकधी त्यांना एकांतात राहणे आवडते. हे लोक यश मिळेपर्यंत त्यांच्या योजना उघड होऊ देत नाहीत.
प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याची सवय -
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीमध्ये खूप उत्साह आणि ऊर्जा दिसून येते आणि यामुळेच ते खूप सक्रिय असतात. तथापि, ते खूप महत्त्वाकांक्षी देखील असतात. यामुळे त्यांना समाधान मिळत नाही आणि त्यांना अधिकाधिक काही साध्य करायचे आहे. त्यांना प्रत्येक काम वेळेत पूर्ण करायचे असते. ते थोडे हट्टी असतात, पण त्यांचा स्वभाव शांत असतो.
चांगले मित्र आणि चांगले जीवनसाथी बनतात -
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची सर्वात मोठी खासियत ही आहे की, त्यांच्यात सर्व लोकांबद्दल प्रेम आणि सौहार्द आहे. मात्र, त्यांच्या कामात कोणाचा ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. अश्विनी नक्षत्राचे लोक चांगले मित्र आणि चांगले जीवनसाथी सिद्ध होतात. ते आपल्या लाइफ पार्टनरची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि आपले म्हणने जोडीदारावर लादत नाही. ते आपल्या कुटुंबासाठी एकनिष्ठ राहून घरच्या लोकांना सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतात.
चैतन्यशील आणि आनंदी -
अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक उत्साही आणि प्रसन्न स्वभावाचे असतात. ते अतिशय निडर आणि धाडसी असतात आणि त्यांची नेतृत्व क्षमताही अप्रतिम असते. दानधर्म करण्यातही ते पुढे असतात.
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्यांच्या नकारात्मक गोष्टी -
- हे लोक खूप हट्टी असू शकतात.
- चटकन रागावतात आणि तणाव सहन करू शकत नाहीत.
- कधी अचानक ते खूप आनंदी होतात, तर कधी अचानक खूप दुःखी होतात.
हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Small baby