जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / या मंदिराला भेट देताच जुळतील रेशीमगाठी, असं काय खास पाहा VIDEO

या मंदिराला भेट देताच जुळतील रेशीमगाठी, असं काय खास पाहा VIDEO

या मंदिराला भेट देताच जुळतील रेशीमगाठी, असं काय खास पाहा VIDEO

तुमचं लग्न ठरत नाही मग या मंदिराला भेट द्या! लगेच जुळतील रेशीम गाठी…. बघा VIDEO

  • -MIN READ Local18 Ranchi,Ranchi,Jharkhand
  • Last Updated :

रांची : बऱ्याचदा असं होतं की आपल्याला हवा असलेला जोडीदार मिळत नाही किंवा काहीवेळा लवकर लग्न ठरत नाही. त्यामध्ये अडथळे येत असतात. सगळे प्रयत्न करत असताना मनापासून तुम्ही किंवा घरचे देवालाही साकडं घालत असता. एवढंच नाही तर नवस उपास, तप किंवा इच्छेचा धागा बांधत असता. हा नवसाचा धागा आपण मंदिरात बऱ्याचवेळा बघतो. काहीजणांच्या इच्छा पूर्ण होतात तर काहीजणांच्या नाही. झारखंडची राजधानी रांचीच्या नामकोममध्ये मरशिली पर्वत आहे, तिथे भगवान शिवाचे मंदिर आहे, जिथे ज्याला लग्नाची इच्छा असेल त्याने नवस केल्यावर लग्न होतं असा दावा तिथले लोक करतात. मंदिर समितीचे सदस्य रुडेश्वर यांनी News18 लोकलशी बोलताना याबाबत माहिती दिली. दररोज 10-12 लोक लग्नासाठी नवस मागण्यासाठी येतात आणि त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होते. इथे नवस केलेल्या अनेकांची लग्न झालं आहेत. .इच्छा पूर्ण झाल्यावर या डोंगरावर महादेवाच्या समोर लग्न करायला लोकांना आवडतं. 10 किमी चालत येतात आणि महादेवाला श्रद्धेनं नमस्कार करतात. नैना म्हणाली, ‘मी इटलाटू गावापासून 10 किमी चालत इथे आले आहे. कारण इथे मी पाहिले आहे की इथे नवस मागितला की त्यांची इच्छा लगेच पूर्ण होते. त्यामुळे आज मी माझ्यासाठी नवस मागायला आले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा माझे लग्न होत नव्हतं, काही ना काही अडचणी येऊन लग्न मोडत होतं. मात्र इथल्या नवसाबद्दल कळलं आणि मी इथे आलो. माझं लग्न नुकतंच गेल्या महिन्यात झालं. महादेवाला पाहून नवस मागितल्याबरोबर २ महिन्यातच माझे लग्न झाले. आज महादेवाच्या कृपेने मी खूप आनंदी आहे. २४० एकर डोंगरावर पसरलेले हे मंदिर स्वतःच एका रात्रीत बांधले आहे.या मंदिराला ४ दरवाजे आहेत, जे सहसा कोणत्याही मंदिरात दिसत नाहीत.तसेच ते स्वयंभू असल्याचा दावा रुडेश्वर यांनी केला आहे. रोज या मंदिरात किंमान दोन लग्न होतात असा दावा रुडेश्वर यांनी केला आहे. लोक कोणत्याही दिवशी महादेवाच्या समोर लग्न करायला तयार होतात, कोणताही विवाह हा नेहमीच यशस्वी होतो. इथे लग्नासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, फक्त पंडितांना त्यांच्या मताप्रमाणे दक्षिणा द्यावी लागते, म्हणूनच येथे लोक विवाह करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात