क्रमांक 6 : क्रमांक 4 आणि क्रमांक 6 असलेल्या व्यक्तींमध्ये उत्तम मैत्री असते. त्यांची मैत्री इतरांसाठी उदाहरण ठरते. जन्मतारखेची बेरीज 4 आणि नावाची बेरीज (नामांक) 6 असलेली व्यक्ती सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करते. असा क्रमांक असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यक्तीला अमर्याद संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते. व्यवसायातल्या भागीदारांचे हे क्रमांक असतील तर ते परिपूर्ण आणि आदर्श बिझनेस आयकॉन ठरतात. तसंच या क्रमांकाची स्पंदनं असलेली विवाहित जोडपी सर्वोत्तम आणि आदर्श जोडपी असतात. तसंच ते जबाबदार पालकही असतात. शुभ रंग - निळा शुभ वार - शुक्रवार शुभांक - 6 प्रोफेशन : राजकारण, क्रीडा, अभिनेता, मोटिव्हेशनल स्पीकर, माध्यम जगत क्रमांक 7 : ज्या व्यक्तीचे क्रमांक 4 आणि क्रमांक 7 हे प्रभावी असतील, तर ते संबंधित व्यक्तीला एक तर अत्यंत उच्च किंवा अत्यंत खालच्या पातळीवर नेतात. या क्रमांकाच्या व्यक्ती उत्तम संशोधक, विश्लेषक, शास्त्रज्ञ, कायद्याच्या अभ्यासक/वकील, गुप्तहेर, राजकीय नेते किंवा क्रीडा प्रशिक्षक असतात; पण आव्हानं आणि खडतर जीवन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. हे क्रमांक व्यवस्थापन आणि आदेश यांचे उत्तम कॉम्बिनेशन असते.
या व्यक्ती नेहमी गुप्त ज्ञान जाणून घेण्यास उत्सुक असतात. या व्यक्ती प्रवास आणि तंत्रज्ञानप्रेमी असतात. या लोकांसाठी 5 आणि 6 अक्षरी नाव लकी असतं. आपण मनमोकळं आणि शेअर करणाऱ्या व्यक्ती बनायला हवं, हे त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. या क्रमांकाची जोडपी असुलभ आणि कमी अनुरूप असतात. ते दोघंही खूप व्यावहारिक आणि तर्कशुद्ध असतात. त्यामुळे त्यांची इमोशनल अटॅचमेंट कमी असते. हे वाचा - ओठांच्या आकारावरून ओळखू शकता समोरच्याचं व्यक्तिमत्त्व आणि बरंच काही.. शुभ रंग - पिवळा शुभ वार - सोमवार शुभांक - 6