मराठी बातम्या /बातम्या /religion /पैसे मोजताना तुमच्याकडूनही होते का अशी चूक? सुख-श्रीमंती वाऱ्यावर जाईल उडून

पैसे मोजताना तुमच्याकडूनही होते का अशी चूक? सुख-श्रीमंती वाऱ्यावर जाईल उडून

पैसे मोजताना होणाऱ्या चुका

पैसे मोजताना होणाऱ्या चुका

कधी-कधी माणसाच्या हातून काही चुका होतात, ज्याची त्याला जाणीव नसते आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. मग त्यामागचे कारण शोधणे अवघड होऊन बसते. पैशाशी संबंधित होणाऱ्या काही चुकांविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 डिसेंबर : हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीचे प्रतीक मानले जाते. माता लक्ष्मीची आराधना केल्याने सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती कधीही कमी पडत नाही, असं मानलं जातं. याउलट जर देवी लक्ष्मी आपल्यावर कोपली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. स्वच्छ आणि नीटनेटक्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात घाण असते, माता तेथून निघून जाते आणि त्या ठिकाणी गरिबी पसरते. कधी-कधी माणसाच्या हातून काही चुका होतात, ज्याची त्याला जाणीव नसते आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. मग त्यामागचे कारण शोधणे अवघड होऊन बसते. पंडित कृष्णकांत शर्मा यांनी पैशांशी संबंधित कोणत्या चुका करू नयेत, याविषयी दिलेली माहिती पाहुया.

अन्न आणि पैसे एकत्र नको -

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही ज्या पर्स किंवा पाकिटामध्ये पैसे ठेवत आहात, त्यात अन्नपदार्थ कधीही ठेवू नयेत. असे केल्याने पैशांचा अपमान होतो. त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

आदराने पैसे द्या -

कोणत्याही गरजू किंवा गरीबालाही पैसे देताना नीट आणि सन्मानाने दिले पाहिजेत. पैसे फेकून दिल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते.

थुंकी लावून मोजू नका -

वास्तुशास्त्रानुसार, नोटा मोजताना कधीही बोटांना थुंकी लावून मोजू नका. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो, असे मानले जाते. त्याऐवजी नोटा मोजताना पाणी किंवा पावडरचा वापर करावा.

पलंगावर पैसे ठेवू नका -

पलंगाच्या बाजूला किंवा पलंगाच्या उशाशी कधीही पैसा ठेवू नयेत. देवी लक्ष्मीच्या पैशांना नेहमी व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवणे नेहमीच शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते.

पैशाला नमन

वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी पैशामध्ये वास करते, त्यामुळे जेव्हाही तुम्हाला रस्त्यावर किंवा कुठेही पैसे पडलेले दिसतील, तेव्हा ते उचलून त्याला नमन करायला विसरू नका.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Money, Money matters