सोलापूर 6 जानेवारी : श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा अवघ्या काही दिवसांवरच आली आहे. सध्या सर्व शहरात यात्रेची लगबग सुरू झाली आहे. अनेक परंपरांना आणि संस्कृतींना विशिष्ट असे महत्त्व या यात्रेत आहे. त्यापैकी योगदंडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सोलापूरचे वंशपरंपरागत असणारे सोमशंकर देशमुख यांच्याकडे श्री सिद्धरामेश्वरांचा योगदंड आहे. चला तर मग या योगदंडाला सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये काय महत्व आहे जाणून घेऊया.
काय आहे महत्व?
सोलापूरची यात्रा ही प्रामुख्याने श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा विवाह सोहळा असतो. जन्मभर ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतलेल्या सिद्धरामेश्वरांचे लग्न हे योगदंडासोबत लावले गेले होते. परंतु त्याचाच प्रतीकात्मक म्हणून 7 मानाचे नंदीध्वज यांच्याशी सिद्धरामेश्वरांचे लग्न लावले जाते. आमच्याकडे असणारा हा योगदंड हा स्वतः सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील आहे सोमशंकर देशमुख हे सांगतात.
मणिपूरच्या विद्यार्थ्यांना मराठीची गोडी! शिक्षणासह संगीताचंही घेतायत मराठीतून शिक्षण, Video
योगदंडाचा कालखंड हा 12 व्या शतकातील
आमचा वाडा आणि सिद्धरामेश्वरांचा योगदंड हे समीकरण आता पक्क बनलं आहे. आतापर्यंत एकदाही हा योगदंड आमच्या वाड्याबाहेर गेला नाही. यात्रेच्या शेवटच्या दिवशी सर्व महत्त्वाचे मानकरी आणि पुजारी या योगदंडाचे दर्शन घेऊन परंपरेनुसार यात्रेचा शेवट करतात. सध्या मुख्य योगदंड हा लाकडी असून त्यावर तांबे ,पितळ आणि चांदीचे आवरण बसवले आहे.
आजही हा योगदंड आम्ही आमच्या देवघरात सुरक्षित ठेवलेला आहे. आम्ही या योग दंडाची नित्यनेमाने पूजा करतो. पुरातत्त्व विभागाच्या मार्फत या योगदंडाचे कालमापन करून घेतलेले आहे. त्यावरुन योगदंडाचा कालखंड हा 12 व्या शतकातील आहे, असं सोमशंकर देशमुख यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.