जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / कोटेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्याने होते संततीप्राप्ती! अशी आहे भाविकांची मान्यता...

कोटेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्याने होते संततीप्राप्ती! अशी आहे भाविकांची मान्यता...

कोटेश्वर महादेव मंदिर

कोटेश्वर महादेव मंदिर

भस्मासुरापासून वाचण्यासाठी भगवान शिव शकंरजींनी कोटेश्वर महादेव मंदिराजवळ असलेल्या या गुहेत काही काळ वास्तव्य केले.

  • -MIN READ Local18 Rudraprayag,Uttarakhand
  • Last Updated :

सोनिया मिश्रा, प्रतिनिधी रुद्रप्रयाग, 8 जून : उत्तराखंडला देवभूमी म्हणतात आणि इथल्या परिसराला स्वर्ग मानले जाते. या स्वर्गीय भूमीत अनेक मंदिरे आहेत, ज्यांची स्वतःची एक आख्यायिका आहे आणि अनेक मंदिरांचे वर्णन पुराणातही आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर असलेले कोटेश्वर महादेव म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे असेच एक प्राचीन मंदिर आहे. इथे खऱ्या मनाने काही मागितले तर मनोकामना नक्कीच पूर्ण होते अशी मान्यता आहे. त्यामुळेच केवळ श्रावण महिन्यातच नाही तर बहुतांश वेळा मंदिरात भाविकांची वर्दळ असते.

News18लोकमत
News18लोकमत

कोटेश्वर महादेव मंदिराचे महंत सच्चिदानंद गिरी मंदिराचे महत्त्व सांगतात की, अपत्य प्राप्तीच्या इच्छेने कोटेश्वर महादेव मंदिरात दुरून येथे अनेक दाम्पत्य पोहोचतात. मंदिराशेजारी कोटेश्वर येथील खडकावर 15-16 फूट लांब आणि 2-6 फूट उंचीची नैसर्गिक गुहा आहे, ज्यामध्ये अनेक शिवलिंग विराजमान आहेत.

त्यांनी सांगितले की, कोटेश्वर महादेव मंदिराविषयी असे मानले जाते की, भगवान शिवाने भस्मासुरपासून वाचण्यासाठी या मंदिराजवळील गुहेत काही काळ वास्तव्य केले होते. भस्मासुरला भोलेनाथाची पूजा करून हे वरदान मिळाले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याच क्षणी त्याची राख होईल. हे वरदान आजमावण्यासाठी त्याने भगवान शिवाचीच निवड केली. मग काय, समोर शिवजी आणि पाठीमागे भस्मासुर. ते पुढे म्हणाले होते की, जो कोणी येथे 7 दिवस आणि 7 रात्री निर्मळ मनाने भगवान शंकराची पूजा करतो, त्याची बुद्धी गुरू बृहस्पतीप्रमाणे तीक्ष्ण होते आणि भगवान शिव त्याच्या ज्ञानात वाढ करतात. स्कंद पुराणातील केदारखंडात आहे मंदिराचे वर्णन - पौराणिक मान्यतेनुसार, भस्मासुरापासून वाचण्यासाठी भगवान शिव शकंरजींनी कोटेश्वर महादेव मंदिराजवळ असलेल्या या गुहेत काही काळ वास्तव्य केले. नंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि भस्मासुराचा वध करताना भोलेनाथला मदत केली होती. लोकांचा असाही विश्वास आहे की, कौरवांच्या मृत्यूनंतर पांडव मोक्षाचे वरदान मागण्यासाठी भगवान शिवाचा शोध घेत होते, तेव्हा भगवान शिव या गुहेत ध्यानस्थ राहिले. तर मंदिराचे महंत सच्चिदानंद गिरी यांनी सांगितले की, कोटेश्वर महादेवाचे मंदिर अतिशय प्राचीन आहे, ज्याचे स्कंद पुराणातील केदारखंडमध्ये स्पष्ट वर्णन केले आहे. कसे जावे? येथे जाण्यासाठी तुम्हाला ऋषिकेशहून बद्रीनाथ बाय रोड येऊन आधी रुद्रप्रयाग गाठावे लागेल आणि रुद्रप्रयागहून बेलनी पुलावरून मंदिरात जावे लागेल. तसेच अद्याप येथे हेली सेवा आणि रेल्वे सेवा उपलब्ध नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात