अशोक यादव, प्रतिनिधी कुरुक्षेत्र, 17 जुलै : भारतामध्ये अनेक मंदिरे खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाला आपला एक वेगळा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराची एक आख्यायिका आहे. हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथेही एक असेच मंदिर आहे आणि ते म्हणजे हरियाणा राज्यातील एकमात्र प्राचीन शक्तिपीठ भद्रकाली मंदिर. इथे राष्ट्रपतींपासून ते अनेक मंत्री भेट देतात. काय आहे मंदिराची आख्यायिका, काय आहे याबाबत लोकांची श्रद्धा ते जाणून घेऊयात. या मंदिरात भगवान बलराम यांचे मुंडन केले गेले होते. या मंदिरात अनेक दूरदूरवरुन भाविक येतात. 5 वर्षांपूर्वी याठिकाणी एका भाविकाने घोडे दान केले होते. मात्र, आता याठिकाणी मातीचे घोडे दान केले जातात. याची किंत 15 ते 20 रुपये आहे.
भारताच्या राष्ट्रपतींनी दिलीए याठिकाणी भेट - माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांनी इथे चांदीचे घोडे दान केले होते. त्यांनी केलेले दान आजही या मंदिरात आहे. तसेच देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही याठिकाणी घोडे अर्पण करायला येत असतात आणि देवीचे दर्शन घेतात. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नीही इथे दर्शनासाठी येऊन गेल्या आहेत. हरियाणाच्या एकमात्र शक्तीपीठ असलेल्या श्री देवीकूप भद्रकाली राज्यातील एकमात्र विख्यात मंदिर आहे. इथे नवरात्री आणि विक्रमी संवतप्रसंगी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनाला येतात आणि मातेच्या दरबारमध्ये पूजा करतात. प्राचीन मान्यतेनुसार, महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी या शक्तिपीठाला आपले घोडे अर्पण केले होते. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. भाविक आपापल्या परीने इथे सोने, चांदी आणि मातीचे घोडे अर्पण करतात. शनिवारी आणि नवरात्रीत याठिकाणी विशेष पूजा होते. धार्मिक कथेनुसार, इथे भगवान शिव यांची पत्नी सती यांच्या डाव्या पायाचा घोटा पडला होता. हे देशातील 52 शक्तीपीठांपैकी एक आहे. कुरुक्षेत्र धर्मभूमीवरील हे मंदिर पौराणिक सावित्री शक्तीपीठ भद्रकालीच्या नावाने प्रसिद्ध आहे. महाभारताच्या युद्धाच्या आधी पांडवांनी याच सावित्री शक्तीपीठात आराधना करुन विजयाची कामना केली होती. तसेच महाभारताचे युद्ध जिंकल्यावर श्रीकृष्ण यांनी सर्वात सुंदर घोड्यांची जोडी याच मंदिरात अर्पण केली होती. तसेच आणखी एका कथेनुसार, बाल्यावस्थेत भगवान श्री कृष्ण यांचे मुंडन संस्कारही याठिकाणी झाला होता.