जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / घरात या ठिकाणी ठेवून बघा मोराची पिसे; दृष्ट लागण्यासारखं कौटुंबिक वातावरण राहतं

घरात या ठिकाणी ठेवून बघा मोराची पिसे; दृष्ट लागण्यासारखं कौटुंबिक वातावरण राहतं

मोरपिसाचे वास्तू उपाय

मोरपिसाचे वास्तू उपाय

मोरपंख आनंदाचे प्रतीक मानले जाते. कारण मोराची पिस खूप आकर्षक असते. मोर पाहिल्यावर जसा आनंद मिळतो, त्याचप्रमाणे मोराची पिसे घरात ठेवल्याने…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 मे : घरात मोरपंख ठेवणे खूप शुभ मानले जाते. ते घरात ठेवल्यानं नकारात्मक शक्ती नष्ट होतात, मोरपंख आनंदाचे प्रतीक मानले जाते. कारण मोराची पिस खूप आकर्षक असते. मोर पाहिल्यावर जसा आनंद मिळतो, त्याचप्रमाणे मोराची पिसे घरात ठेवल्याने आनंद मिळतो, असे मानले जाते. मोरपंख घरात ठेवल्यानं धनाची कमतरता राहत नाही, त्यासोबतच प्रगतीचा मार्गही खुलतो. अनेक घरांमध्ये लोक मोराची पिसे पुष्पगुच्छ म्हणूनही ठेवतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, घराच्या कोणत्या दिशेला/कोपऱ्यात मोराची पिसे ठेवणे शुभ असते. ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित ऋषिकांत मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊया घरात मोराची पिसे ठेवण्याची योग्य पद्धत. धनसंपत्तीचा योग: दिशांमध्ये आग्नेय दिशा अतिशय शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेचे स्वामी सूर्यदेव आणि इंद्रदेव आहेत. यामुळे घराच्या पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे शुभ असते. हवे असल्यास आपण वायव्य दिशेलादेखील ठेवू शकता. या दिशेला मोराची पिसे ठेवल्याने अपार संपत्ती निर्माण होते, असे मानले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

घरामध्ये सुकाळ राहील: मोराची पिसे वायव्य दिशेला लावणे फार योग्य मानले जात नसले तरी जर कोणाच्या कुंडलीत राहु दोष असेल तर त्यांच्यासाठी ही दिशा शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने राहूचे दोष संपतात. यासोबतच घरातील स्थितीही चांगली होते. रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल वास्तू दोष दूर होतील : घरामध्ये मोराची पिसे लावणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार 8 मोराची पिसे बांधून ईशान्य दिशेला भिंतीला लावावित, असे केल्याने वास्तुदोष संपतो. लक्षात ठेवा की पिसांचा गुच्छ प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी ठेवावा. यामुळे घरात सकारात्मकता राहते. अभ्यासाच्या टेबलावर : वास्तुशास्त्रानुसार शिक्षण मिळविण्यात मोराच्या पिसांचा मोठा वाटा असतो. यासाठी विद्यार्थी वर्गाने आपल्या वहीत किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोरपंख ठेवावे. यामुळे मन अभ्यासात गुंतलेले राहते, असे मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्यासोबत मोरपंख नेहमी ठेवू शकता. श्रीरामावरून बाळाची ही छानशी नावे ठेवू शकता; यापैकी एक तुम्हाला नक्की आवडेल घरातील त्रास संपतील : घरातील बहुतेक लोक सजावटीसाठी मोराच्या पिसाचा वापर करतात. पण, मोराची पिसे घरात नकारात्मक शक्तींना प्रवेश करू देत नाहीत. जर तुम्ही तुमच्या बेडरुमच्या पूर्वेकडील भिंतीवर मोराची पिसे लावली तर घरात भांडण होत नाही. बेडरूममध्ये ठेवा : वास्तुशास्त्रानुसार घराच्या बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवल्याने वैवाहिक जीवनात शांती राहते. यासोबतच आनंदी वातावरण राहते. लग्नानंतर जर पती-पत्नीमध्ये भांडणे सुरू झाली. अशा वेळी मोराची पिसे लावल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते, असे मानले जाते. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोराची पिसे मिळवण्यासाठी आपल्याकडून मोराला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मोराच्या अंगावरून आपोआप निघून पडलेलीच पिसे वापरावीत. Numerology: विश्वास पात्र असतात अशा व्यक्ती; निष्ठावान जोडीदारही बनू शकतात (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात