मुंबई, 21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 2015 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करण्यात आला, तेव्हापासून दरवर्षी 21 जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातो. मानवी शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. काहींच्या मनात प्रश्न येत असेल की, योगाचा जन्म कसा झाला? योगाचे जनक कोण आहेत? प्रथम योगाचा प्रसार कोणी केला? आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरे. योगाचा जन्म कसा झाला? भगवान शंभू-महादेव हे आदियोगी आहेत. योगाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाली, असे मानले जाते. असे म्हणतात की, 15000 वर्षांपूर्वी हिमालयाच्या शिखरावर एक योगी प्रकट झाला होता. लोकांना त्याच्या जन्माबद्दल किंवा भूतकाळाबद्दल काहीही माहिती नव्हते. त्याच्याभोवती लोक जमले आणि बसले. तो काही बोलणार याची प्रत्येकजण वाट पाहत होता. पण तो काहीच बोलला नाही. ते फक्त बसून राहिले. असेच बरेच महिने गेले. जागतिक योग दिनानिमित्त खास कोट्स हळूहळू सर्व लोक निघून गेले आणि फक्त 7 लोक राहिले. ते सात लोक दुसरे कोणी नसून सप्तर्षी म्हणजेच सात ऋषी होते. ते तिथून निघाले नाहीत, जिद्दीने बसून राहिले. मग आदियोगी शिवाने त्यांना काही साधना करायला लावल्या. त्यानंतर जेव्हा सूर्याचे दक्षिणायन झाले तेव्हा त्यांनी आपल्या पहिल्या शिष्य सप्तर्षींना दक्षिणेकडे तोंड करून शिकवायला सुरुवात केली. या दिवसापासून योगास सुरुवात झाली, असे मानले जाते. सप्तर्षींनी योगाचा प्रचार केला - जेव्हा आदियोगींनी सप्तर्षींना संपूर्ण ज्ञान दिले तेव्हा त्यांनी त्यांना सात दिशांना पाठवले. त्यातील एकजण आदियोगीजवळ थांबला. उर्वरित 6 पैकी 2 भारतात आणि 4 जगाच्या विविध भागात गेले. त्यांनी योगाबद्दल लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला.
आधुनिक योगाचे जनक कोण? महर्षी पतंजली यांना आधुनिक योगाचे जनक म्हटले जाते. 5000 वर्षांपूर्वी त्यांनी योग सूत्रांची रचना केली, जो योग तत्त्वज्ञानाचा मूळ ग्रंथ आहे. योगासने सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी सोप्या पद्धतीने केले. त्यांनी अष्टांग योगाबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश आहे. धार्मिक मान्यतेनुसार महर्षी पतंजली यांना शेषनागाचा अवतार मानले जाते. त्याला पाणिनीचा शिष्य असेही म्हणतात. लोक तिरुमलाई कृष्णमाचार्य यांना आधुनिक योगाचे जनक मानतात. आज आषाढ शुक्ल तृतीया, दक्षिणायन आरंभ; पहा सर्व 12 राशींचे राशीभविष्य प्रसिद्ध योगगुरू - सध्या बाबा रामदेव हे योगगुरू म्हणून खूप लोकप्रिय आहेत. परंतु, त्यांच्या पूर्वी प्रसिद्ध योगगुरूंमध्ये तिरुमलाई कृष्णमाचार्य, बीकेएस अय्यंगार, धीरेंद्र ब्रह्मचारी, महर्षी महेश योगी, परमहंस योगानंद, स्वामी शिवानंद सरस्वती, कृष्णा पट्टाभी जोइस इत्यादींचा समावेश आहे. योग आणि ध्यानाद्वारे त्यांनी मानव जीवांचे कल्याण केले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)