जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Video : मुंबईतील हनुमान मंदिरात आहेत 1 लाखांपेक्षा जास्त घंटा, पाहा काय आहे कारण?

Video : मुंबईतील हनुमान मंदिरात आहेत 1 लाखांपेक्षा जास्त घंटा, पाहा काय आहे कारण?

Video : मुंबईतील हनुमान मंदिरात आहेत 1 लाखांपेक्षा जास्त घंटा, पाहा काय आहे कारण?

मुंबईतील ‘या’ हनुमान मंदिरात 1 लाखांपेक्षा जास्त घंटा आहेत. एकाच मंदिरात इतक्या साऱ्या घंटा असण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 16 डिसेंबर : मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हूणन ओळखली जाते. मुंबई मध्ये सर्व धर्मीय लोकं राहतात. त्यामुळे  मुंबई  शहरात अनेक मंदिरे आपल्याला पाहिला मिळतात. त्यापैकीच एक खार मधील श्री घंटेश्वर हनुमान मंदिर आहे. या मंदिरावर अनेक भाविकांची श्रद्धा असून भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराची स्थापना कधी झाली? या मंदिराला श्री घंटेश्वर हनुमान मंदिर का म्हणतात. मंदिराची स्थापना कधी झाली? श्री घंटेश्वर हनुमान मंदिराची स्थापना 1961 साली झाली. तेव्हापासूनच या मंदिरात घंटा बांधल्या जातात. मंदिरात शनीदेवाचा गाभारा आहे तसेच एकीकडे हनुमानाचा गाभारा आहे. मंदिराच्या लोखंडी भिंती तसेच आतील संपूर्ण भाग हा लहान मोठ्या घंटांच्या माळानी भरलेला आहे. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त घंटा या मंदिरात बांधलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर एक पिंपळाचे वृक्ष सुद्धा आहे. अनेक दिग्गज मंडळी सुद्धा येथे प्रार्थना करण्यासाठी येतात.

    खरा मावळा! 27 वर्षांपासून एक पैसा न घेता महाराजांची सेवा करणारे मेहबूब हुसेन, Video

    या हनुमानाला घंटेश्वर का म्हणतात? आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी अनेक लोकं श्री घंटेश्वर हनुमान चरणी प्रार्थना करतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली की लोकं येथे येऊन घंटा बांधतात. लोकांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर दान केलेल्या घंटांनी या मंदिराला घंटेश्वर हे नाव पडले आहे. या मंदिरात तुम्ही काही मागितले की तुमची इच्छा पूर्ण होईल अशी श्रद्धा आहे, असं मंदिरात सेवा देणारे प्रशांत गिरकर सांगतात. मंदिरात प्रार्थना करताना काय म्हटलं जातं? श्री घंटेश्वर हनुमान मंदिरात शनिवारी व मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता पूजा होते. तर इतर दिवशी 7 वाजता पूजा केली जाते. यावेळी हनुमान चालीसा म्हटली जाते. मंगळवार आणि शनिवारी दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. हे दोन दिवस रांगेत असताना किमान 45 मिनिटे ते सुमारे 1 तास दर्शनाला लागतो.

    मुंबईत दोन आहेत ‘गेट वे ऑफ इंडिया’, दुसऱ्याचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video

    गुगल मॅपवरून साभार  श्री घंटेश्वर हनुमान मंदिर कुठे आहे? श्री घंटेश्वर हनुमान मंदिर हे मुंबईतील खार परिसरात आहे. खार  स्टेशन रोडपासून ते 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. खारमधील प्रसिद्ध मधू पार्कला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला ते आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात