मुंबई, 02 एप्रिल : चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी 6 एप्रिल 2023 रोजी, गुरुवारी हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा करून हनुमान चालिसाचे पठण केल्यास बजरंगबलीची कृपा होते, तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हनुमान चालिसेच्या काही विशेष दोह्यांचे पठण केल्यानं व्यक्तीला सर्व दु:खांपासून मुक्ती मिळते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा हनुमान चालिसेचे 4 श्लोक सांगत आहेत, ज्याचे पठण केल्यानं मनुष्याला धन, सामर्थ्य आणि बुद्धीचा आशीर्वाद मिळतो.
हनुमान मंत्राचा जप आणि दोहे
1. नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरन्तर हनुमत बीरा।
श्रद्धेनुसार, जे लोक सतत आजारी असतात. आजारांना कंटाळलेल्यांनी हनुमान चालिसा म्हणावी, चालिसेतील या चौपईचा पाठ अवश्य करावा. या चौपाईचा पाठ केल्याने आजार बरे होतात. नियमित पठण करणाऱ्याला बळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
2. ॐ महाबलाय वीराय चिरंजिवीन उद्दते ।
हारिणे वज्र देहाय चोलंग्घितमहाव्यये ।।
जर तुम्हाला काही वेगळं, खास करण्याची इच्छा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.
3. ।। ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ।।
धार्मिक मान्यतेनुसार, या मंत्राचा जप केल्यानं शत्रू आणि रोगांवर विजय मिळवता येतो. या मंत्राचा जप 108 वेळा करावा.
4. 'विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
विद्यार्थ्यांनी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करावे. हनुमान चालिसाच्या या ओळींचे पठण केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते असे मानले जाते.
हनुमान चालिसाचे फायदे -
धार्मिक मान्यतेनुसार, हनुमान जयंतीला हनुमान चालिसाचे पठण केल्याने सुख-शांती मिळते.
हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीची आर्थिक चिंता दूर होते आणि मनोबल वाढते.
यासोबतच हनुमानाचा आशीर्वादही प्राप्त होतो.
हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hanuman, Hanuman Jayanti, Hanuman mandir