सोलापूर, 2 जुलै - भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या प्रति असणारी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. शिवाय त्या दिवशी गुरूंच्या चरणी आपण नतमस्तक होऊन त्यांना आपल्या सर्वांगीन शक्तीचे म्हणजेच बुद्धीचे समर्पण करतो. आपणाला सर्वांना माहित आहे की गुरुपौर्णिमा ही का साजरी केली जाते. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी या आवर्जून करायच्याच असतात. गुरु विना मिळणारे प्रत्येक विद्या ही आंधळी अशी मानली जाते. त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कृतज्ञ प्रित्यर्थ त्यांना गुरु दान करावं. परंतु प्रत्यक्षात त्या दिवशी काय करायचं या संदर्भात अधिक माहिती सोलापुरातील दाते पंचांगचे सर्वेसर्वा मोहन दाते यांनी दिली.
गुरुंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दिवशी संन्यास आश्रमात असणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांना त्यांच्या त्यागाप्रती आणि त्यांच्या निष्ठेप्रती समर्पित झाले पाहिजे. काही लोकांनी गुरुंकडून दीक्षा घेतलेली असते. त्यांना आज गुरुदक्षिणा दिली जाते. काहींनी दीक्षा घेतलेली नसली तरी स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, यांच्या सारखे संत मंडळींच्या स्थानी गुरुस्थान असते. या दिवशी त्यांचं स्मरण करावं. तसेच अनेकजण गुरु दत्तात्रय यांची पूजा अर्चा करतात, असे दाते यांनी सांगितले. अन्नदानाचं महत्त्व नाही गुरुपौर्णिमा हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरुपौर्णिमेदिवशी अन्नदानाचं विशेष महत्त्व नाही. तर गुरुदक्षिणा आणि गुरुस्मरण महत्त्वाचं आहे. तसेच उपवास वगैरे करण्याची गरज नाही. तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे सोवळे करण्याची गरज नाही, असे मोहन दाते यांनी सांगितले. Guru Purnima : गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर करा ‘या’ गोष्टी, आयुष्यात सर्वार्थानं होईल उन्नती, Video गुरुपौर्णिमा का करायची ? हिंदु धर्मांत महर्षी व्यास आद्य गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते, अशी मान्यता आहे. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचेही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कृतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणूनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे. गुरु-शिष्य परंपरा आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मृती प्रित्यर्थही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)