मुंबई, 04 मे : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. बुद्ध पौर्णिमा हा दिवस गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरा केला जातो. दुसरीकडे, ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे, परंतु ग्रहणाचे धार्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या दिवशी काही विशेष योगही तयार होत आहे. 130 वर्षांनंतर चंद्रग्रहण आणि बुद्ध पौर्णिमा एकत्र आलं आहे. जाणून घ्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. बुद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण - 2023 मधील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. या चंद्रग्रहणाचे वर्णन छाया चंद्रग्रहण असे केले जात आहे. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या रात्री म्हणजे 5 मे रोजी रात्री 8.45 वाजता होईल आणि रात्री 1:00 वाजता समाप्त होईल. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक काळ वैध राहणार नाही. वैशाख पौर्णिमा 4 मे रोजी रात्री 11.34 वाजता सुरू होत असून 5 मे रोजी रात्री 11.03 वाजता समाप्त होईल. वैशाख पौर्णिमेची उदय तिथी 5 मे रोजी आहे, त्यामुळे पौर्णिमेचे स्नान, दान व पूजा इत्यादी 5 मे रोजीच होतील. पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त पहाटे 04.12 ते 04.55 पर्यंत असतो. चंद्राला अर्घ्य देण्याचा मुहूर्त 05 मे रोजी सायंकाळी 06.45 वाजता आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या चुका टाळाव्यात - धार्मिक मान्यतेनुसार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न, मद्य आणि मांसाहार इत्यादी खाण्यास मनाई आहे. चंद्रग्रहणामुळे गरोदर महिला आणि वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या दिवशी विशेष खबरदारी घेण्यास सांगितले जाते. शनीच्या ग्रहस्थितीमुळं दुर्मिळ शश महापुरुष योग; या 5 राशीच्या लोकांसाठी वरदान बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, बौद्ध धर्माचे अनुयायी मुक्ती आणि अहिंसेचा एक प्रकार म्हणून पक्षी आणि प्राणी पिंजऱ्यातून मुक्त करतात. जर तुमच्या घरात पक्षी असतील तर त्यांना या दिवशी पिंजऱ्यात ठेवू नका. या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पाने तोडल्यास भगवान विष्णूचा आपल्यावर कोप होऊ शकतो. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)