मुंबई, 29 एप्रिल : भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप कष्ट घेत असते, परंतु अनेक वेळा आपण केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही. अनेकवेळा आपल्याला असे वाटते की, आपले नशीब आपल्याला साथ देत नाही. यासाठी चांदीची अंगठी तुमच्या समस्या सोडवू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, वेगवेगळ्या धातू आणि रत्नांनी बनवलेल्या अंगठ्या आपल्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करतात. ज्योतिषशास्त्रात या धातू आणि रत्नांचा संबंध नऊ ग्रहांशी सांगितला आहे. चांदीची अंगठी देखील यापैकी एक महत्त्वाचा धातू आहे. दिल्लीचे ज्योतिषी आचार्य पंडित आलोक पंड्या चांदीची अंगठी घालण्याचे फायदे सांगत आहेत. चांदीची अंगठी शुक्र आणि चंद्राशी संबंधित - सोन्या-चांदीचे दागिने स्त्रियांचे सौंदर्य वाढवतात. सोन्या-चांदीपासून बनवलेल्या या दागिन्यांचा कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांवरही परिणाम होतो, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. सोन्याचा संबंध गुरू ग्रहाशी आहे तर चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी मानला जातो. मान्यतेनुसार, चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांपासून झाल्याचे मानले जाते, म्हणून जिथे चांदी आहे तिथे धन, वैभव आणि समृद्धी येते. याशिवाय काही राशीच्या लोकांना चांदीची अंगठी घालणे खूप फायदेशीर ठरू शकते.
अशी चांदीची अंगठी घाला - ज्योतिष शास्त्रानुसार, चांदीची अंगठी घालायची असेल तर ती जोड नसलेली, अंखंड रिंग असावी. शक्यतो अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी. स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणे शुभ असते. असे मानले जाते की, चांदीची अंगठी चंद्राची कारक आहे. ती धारण केल्यानं कुंडलीत सूर्य आणि शनीची स्थिती मजबूत होते. यासोबतच नशीबही बळकट होते. याशिवाय चांदीची अंगठी धारण केल्यानं राहू ग्रह दोषापासून मुक्ती मिळते आणि मन शांत राहते. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी चांदीची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते. वृषभ आणि तूळ राशीचे लोकही चांदीची अंगठी घालू शकतात. पण मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये. शनीच्या ग्रहस्थितीमुळं दुर्मिळ शश महापुरुष योग; या 5 राशीच्या लोकांसाठी वरदान चांदीची अंगठी धारण करण्याचा फायदा - चांदीची अंगठी धारण केल्यानं शुक्र आणि चंद्र दोघेही शुभ फळ देतात. मन आणि मेंदू शांत राहतो. राग आटोक्यात येतो, तसेच धन आणि सुख-समृद्धी वाढते. वात, कफ, पित्त या समस्यांचे संतुलन शरीरात राहते. जर तुम्हाला हातात चांदीची अंगठी घालण्याची इच्छा नसेल तर अभिमंत्रित करून चांदीचे कडे, साखळीही घातली जाऊ शकते. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)