जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Hanuman Chalisa : हनुमान चालीसा पठणाने जीवनात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या ओळींचा अर्थ

Hanuman Chalisa : हनुमान चालीसा पठणाने जीवनात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या ओळींचा अर्थ

हनुमान चालीसा पठणाने जीवनात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या ओळींचा अर्थ

हनुमान चालीसा पठणाने जीवनात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या ओळींचा अर्थ

हनुमान चालिसामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत यशाची अनेक सूत्रे दडलेली आहेत. अयोध्येतील प्राचीन सिद्धपीठ हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी हनुमान चालिसेचे महत्व समजावून सांगितले.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अयोध्या, 24 जून : हनुमान भक्त हनुमान चालिसाच्या पठणाने आपल्या दैनंदिन दिनचर्येची सुरुवात करतात. जर तुम्ही रोज हनुमान चालिसाचे पठण केले तर तुम्हाला नक्कीच शक्ती मिळेल. पण जर तुम्ही हनुमान चालीसेचा अर्थ समजून घेतलात तर त्यात तुम्हाला जीवनाचा अर्थ समजेल यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल. हनुमान चालिसामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत यशाची अनेक सूत्रे दडलेली आहेत. अयोध्येतील प्राचीन सिद्धपीठ हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी हनुमान  चालिसेचे महत्व समजावून सांगितले. महंत राजू दास सांगतात की हनुमान चालिसेत 40 चौपाया आहेत. हनुमान चालिसा अतिशय सुलभ असून माणसाने हनुमान चालिसेतील एकेक ओळ आपल्या जीवनात आचरली तर त्याचे आयुष्य सुधारू शकते. एवढेच नाही तर त्याचे आणि परिवाराचे भविष्यात देखील चांगले होते. हनुमान चालीसेची सुरुवात गुरूपासून होते.  हनुमान चालिसामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी ‘श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी’ असे लिहिले आहे, म्हणजे जर तुमच्या जीवनात गुरु नसेल तर तुम्हाला कोणीही पुढे नेऊ शकत नाही. गुरुच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. आजच्या युगात प्रगतीच्या मार्गावर पुढे जायचे असेल तर मोठ्यांचा आदर केला पाहिजे.

News18लोकमत
News18लोकमत

गोस्वामी तुलसीदास “कांचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा” असे लिहितात. याचा अर्थ हनुमानजींचे शरीर सोन्यासारखे चमकत आहे. छान वस्त्र आहेत आणि कानात  कुंडल आहेत . म्हणण्याचा तात्पर्य अस आहे की, आजच्या युगात माणूस कसा जगतो यावरही त्याची प्रगती अवलंबून असते. तेव्हा तुम्ही तुमची जीवनशैली आणि पेहराव नेहमी चांगला ठेवावा. शनिवारी रात्री अजिबात करू नये या चुका, संकट येऊ शकतात, काय आहे कारण? हनुमान चालिसामध्ये तुम्हाला आणखी एक चौपई सापडेल, ज्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी लिहिले आहे “विद्यावान गुणी अति चतुर, राम काज करिबे को अतुर” म्हणजे पवन पुत्र हनुमान विद्यामान असून त्याच्यात अनेक गुण आहेत, तो चतुर देखील आहे आणि प्रभू रामाच्या कार्यासाठी नेहमी तत्पर आहे. म्हणजे आजच्या काळात चांगली पदवी असणे खूप गरजेचे आहे. पदवीसोबतच बुद्धिमत्ता, हुशारी हे गुण असणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात