जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / घरात या दिशेला घोड्याची नाल लावली की चिंताच मिटली! पाहाल शुभ परिणाम

घरात या दिशेला घोड्याची नाल लावली की चिंताच मिटली! पाहाल शुभ परिणाम

घोड्याच्या नालीचे उपाय

घोड्याच्या नालीचे उपाय

घोड्याच्या पायातून निघून पडलेली नाल सापडली तर खूपच चांगलं. पण, जर सापडली नाही तर लोहाराकडून बनवलेली नालही चालू शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : अनेकांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावलेली आपण पाहिली असेल. असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत, जे घरात करणे भाग्यशाली मानले जातात. घोड्याच्या नालीचा उपाय यापैकीच एक आहे, ज्योतिष शास्त्रानुसार घोड्याची नाल घरात ठेवल्यानं सुख-शांती तर मिळतेच पण पैशांची कमतरताही दूर होते. पण आपल्यापैकी अनेकांना घोड्याची नाल घरी ठेवण्याबद्दल फारशी माहिती नसते. आज ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा याविषयी सांगत आहेत, तुम्ही तुमच्या घरामध्ये घोड्याची नाल कोणत्या दिशेला आणि कशी लावू शकता, याविषयी पाहुया. घोड्याचा नाल कसा लावायचा घोड्याच्या पायातून निघून पडलेली नाल सापडली तर खूपच चांगलं. पण, जर सापडली नाही तर लोहाराकडून बनवलेली नालही मिळू शकते. पंडितजींच्या म्हणण्यानुसार, घोड्याची नाल घरात लावण्यापूर्वी गंगाजल किंवा पवित्र पाण्याने ती धुवावी. यानंतर सूर्यप्रकाशात ठेवून ती वाळवावी. असे केल्याने सूर्याच्या किरणांमुळे घोड्याची नाल सकारात्मक उर्जेने भरली जाते. यानंतर घोड्याची नाल घरातील देव्हाऱ्यात नेऊन देवी लक्ष्मीसमोर ठेवा आणि हळद-कुंकू तांदूळ त्याला लावा, नाल समोर असतानाच लक्ष्मीची पूजा करा. पूजा झाल्यावर लक्ष्मीची आरती करा आणि देवीला तुमची इच्छा, मनोकामना सांगा. घोड्याचा नाल कोणत्या दिशेला ठेवायची - घोड्याच्या नालेवर काळा धागा बांधून घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला लटकवा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्याचबरोबर घरात सुख-शांती नांदेल. याशिवाय जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा आग्नेय दिशेला असेल तर या दिशेला घोड्याची नाल अजिबात लावू नये. त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे वाचा -  ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात