मराठी बातम्या /बातम्या /religion /या मंदिराच्या मातीने शेतीची वाढते सुपिकता, भाविकांची अनोखी श्रद्दा, जाणून घ्या, इतिहास

या मंदिराच्या मातीने शेतीची वाढते सुपिकता, भाविकांची अनोखी श्रद्दा, जाणून घ्या, इतिहास

अन्नपूर्णा देवीचे मंदिर

अन्नपूर्णा देवीचे मंदिर

देशातील या मंदिराच्या मातीसंदर्भात भाविकांची अनोखी श्रद्धा आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Kannauj, India

अंजली शर्मा, प्रतिनिधी

कन्नौज, 23 मार्च : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर तिरवा परिसरात सिद्धपीठ मां अन्नपूर्णा देवीचे जगप्रसिद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. इथल्या मातीत चमत्कार घडतो, इथली माती खऱ्या भावनेने घेऊन शेतात टाकली तर शेताची सुपीकता वाढते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कारण माता अन्नपूर्णेला अन्नाची देवी म्हटले जाते. त्यामुळे दरवर्षी आषाढी पौर्णिमेला येथे खूप मोठी यात्रा भरवली जाते. याठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक माता अन्नपूर्णेच्या दर्शनासाठी येतात आणि मंदिर परिसराची माती प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात.

हे मंदिर 16व्या शतकात राजा प्रीतम सिंह यांनी बांधले होते. त्या काळात फक्त राजघराण्यातील लोकच त्यात पूजा करत असत. राजा प्रीतम सिंह यांना मुलीच्या रूपात देवीचे दर्शन झाले आणि त्यांनी सांगितले की, या ठिकाणी खोदून काहीतरी मिळेल. त्यानंतर राजा प्रीतम सिंह यांनी येथे खोदकाम केले आणि त्यांना येथे देवीची मूर्ती सापडली. त्यानंतर राजा प्रीतम सिंह यांनी येथे मंदिर बांधले.

मंदिराचा इतिहास काय?

हे सुमारे 16व्या शतकात कन्नौज तिरवाचे तत्कालीन राजा प्रीतम सिंग यांनी बांधले होते. स्वप्नात देवीच्या आदेशानंतर राजाने या भागात खोदकाम करून घेतले. खोदकाम करताना राजाला येथे एका देवीची मूर्ती सापडली. राजाने या मंदिराला सिद्धपीठ माता अन्नपूर्णा मंदिर असे नाव दिले. त्यावेळी येथे पूजा करण्याची परवानगी फक्त राजघराण्यालाच होती. मात्र, हळूहळू वेळ गेली आणि नंतर सर्वांना देवीच्या दर्शनाची परवानगी मिळाली. याठिकाणी मंदिरातील कलाकृती पाहूनच ते किती पुरातन आणि जुने असेल ते लक्षात येते.

जे मागाल ते वरदान देते देवी, हजारो वर्षांचा इतिहास; विश्वास बसत नाही पाहा VIDEO

मंदिराच्या बाहेरील भागात लहान दगडांपासून बनवलेल्या हत्तींची मालिका आहे. ते मंदिराची सुरक्षा करत आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या हत्तींबद्दल आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि ती म्हणजे कोणीही हे सर्व हत्ती बरोबर मोजून दाखवू शकत नाही. जितक्या वेळा मोजले जातात, तितक्या वेळा काही ना काही घोळ होतो. तसेच दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे भव्य यात्रा भरवली जाते. या यात्रेत देशभरातून भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात.

मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे. देवीला अन्नाची देवी म्हटले जायचे. त्यामुळे मंदिराच्या आवारातील माती हाच मातेचा खरा प्रसाद असल्याचे मानले जाते. भाविक इथली माती त्यांच्या घरी घेऊन जातात आणि त्यांच्या शेतात टाकतात, त्यामुळे त्यांच्या शेताची सुपिकता वाढते, अशी मान्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Famous temples, Local18, Temple, Uttar pradesh