मुंबई, 27 डिसेंबर : आपल्या घरात सुख-समृद्धी राहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत असते. असे बरेच लोक वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करतात आणि आपल्या घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करतात. वास्तुशास्त्रात असे अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, जे मानवी जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून आनंदी जीवन देऊ शकतात. यापैकी एक उपाय म्हणजे तांब्याच्या धातूचा सूर्य घरात बसवणे. तांब्याचा सूर्य घरात लावल्याने काय फायदा होतो आणि तो कोणत्या दिशेला ठेवायचा? याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा अधिक माहिती देत आहेत. तांब्याचा सूर्य घरी लावण्याचे फायदे - - वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात तांब्याचा सूर्य ठेवला तर त्याच्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, कीर्ती, यश आणि समृद्धी प्राप्त होते. तांब्याचा सूर्य हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. -तांबे हा एक प्रभावशाली धातू आहे. ज्याप्रमाणे घरात तांब्याचा सूर्य ठेवल्याने सकारात्मक उर्जा वाढते, त्याचप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यातही मदत होते. तांब्याच्या सूर्यापासून निघणारी ऊर्जा घरातील वातावरण शुद्ध आणि समृद्ध बनवते. यामुळे कौटुंबिक कलह आणि तणाव दूर होतो. -जर तुम्हाला यशस्वी आणि लोकप्रिय व्हायचे असेल तर तुमच्या घरात तांब्याचा सूर्य अवश्य ठेवा. या व्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी तांब्याचा सूर्य लावून अधिक यश मिळवू शकता. घरी तांब्याचा सूर्य लावण्याचे नियम - वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या पूर्वेला खिडकी किंवा दरवाजा नसेल तर तुम्ही त्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावू शकता. असे केल्याने ती ऊर्जा पूर्ण मिळते, जी पूर्वेदिशेने सूर्याकडून मिळायला हवी. - वास्तुशास्त्रानुसार पूजा घराच्या उत्तर-पूर्व भिंतीवर तांब्याचा सूर्य लावणे शुभ मानले जाते. - दिवाणखान्यात तांब्याचा सूर्य पूर्व दिशेला टांगल्याने वातावरण प्रसन्न राहते. -वास्तूनुसार, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणीही पूर्वेकडील भिंतीवर तांब्याचा सूर्य लावू शकता. असे केल्याने तुमचा व्यवसाय वाढेल, तुम्हाला चांगली नोकरीची ऑफर मिळेल. तुमच्या अनेक मनोकामनाही पूर्ण होतील.
काय करू नये - वास्तुशास्त्रानुसार तांब्याचा सूर्य बेडरूममध्ये कधीही ठेवू नये. तांब्याच्या सूर्याला नेहमी स्वच्छ ठेवा, अन्यथा त्याचे नकारात्मक परिणामही दिसू शकतात. - तुमच्या घरातील तांब्याचा सूर्य कोठून तरी तुटला असेल तर लगेच काढून टाका/ बदला. हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)