मराठी बातम्या /बातम्या /real-estate /

MHADA Lottery 2022 : मुंबईकरांसाठी खूशखबर! दिवाळीत म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; लवकरच होणार घोषणा

MHADA Lottery 2022 : मुंबईकरांसाठी खूशखबर! दिवाळीत म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; लवकरच होणार घोषणा

MHADA Lottery 2022 : मुंबईकरांसाठी खूशखबर! दिवाळीत म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; लवकरच होणार घोषणा

MHADA Lottery 2022 : मुंबईकरांसाठी खूशखबर! दिवाळीत म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; लवकरच होणार घोषणा

Mumbai MHADA Lottery 2022: यंदा दिवाळीमध्ये मुंबईत चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडानं तयारी सुरु केली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 22 ऑगस्ट: मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र मुंबईतील घरांच्या किंमती पाहता येथे घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. अशा परिस्थितीत सामान्य लोकांचं घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहतं. अशावेळी लोकांना मोठा आधार असतो, तो म्हाडाचा (Mumbai Mhada News). म्हाडाच्या माध्यमातून अनेक लोकांना स्वस्त किमतीमध्ये आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं. त्यामुळं म्हाडाच्या लॉटरीकडं (MHADA Lottery) मुंबईकरांचं कायमच लक्ष लागलेलं असतं. मात्र गेल्या तीन वर्षांत म्हाडानं मुंबईतल्या घरांसाठी लॉटरी काढली नाही.  मात्र ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. यंदा दिवाळीमध्ये मुंबईत चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडानं तयारी सुरु केली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरं असतील. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा लॉटरीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडानं घेतला होता. मात्र येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल अशा घरांचाही समावेश सोडतीत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दिवाळीमध्ये चार हजार घरांची सोडत-

यंदा दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला आहे. त्यासाठीची तयारीदेखील म्हाडानं सुरू केली आहे. म्हाडातर्फे या लॉटरीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी लवकरच ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांना आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. महिन्याभरात याविषयीची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. या लॉटरीत पहाडी, गोरेगाव येथील 3,015 घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील 2,683 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अ‍ॅन्टॉप हिल, विक्रोळी इत्यादी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.

हेही वाचा- '90 टक्के लोकांना एसी लोकलची गरज नाही', जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत दावा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना काहीच दिवसांपूर्वी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात घोषणा केली होती. दरम्यान एका वृत्तपत्राशी बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिवाळीत मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली.

First published:

Tags: Mhada 2022, Mhada lottery, Mumbai